Home चंद्रपूर मौजा राजोलि फाल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी थोर...

मौजा राजोलि फाल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून प्रगती पथावर वाटचाल करावी– नितीन गोहने

मौजा राजोलि फाल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करून प्रगती पथावर वाटचाल करावी– नितीन गोहने

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

दिनांक :- २६ नोव्हेंबर २०२४

चंद्रपूर:-सावली तालुक्यातील मौजा.राजोली फाल येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोली फाल चक नं.२ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, तर अध्यक्ष म्हणून चिचबोडीचे सरपंच मा.सतीश नंदगीरवार उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्याने सकाळी प्रभात फेरी, तसेच विध्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा व पाहुण्यांचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम व दुपारी स्नेहभोजन तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.*

*याप्रसंगी चिचबोडीचे उपसरपंच मा.प्रतिक पेंदाम , माजी सरपंच मा.शामराव बाबनवाडे, पोलीस पाटील राजोली मा.पुंडलिक बाबनवाडे, तसेच ग्राम पंचायत सदस्य मा.शामराव बालाजी बाबनवाडे, सौ.नंदा बाबनवाडे, सौ.माधुरी कोरडे आदी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here