Home चंद्रपूर पेंढरी मक्ता येथे सांस्कृतिक महोत्सव मोठया उत्साहात साजरा संविधानामुळेच भारत जगात सर्वात...

पेंढरी मक्ता येथे सांस्कृतिक महोत्सव मोठया उत्साहात साजरा संविधानामुळेच भारत जगात सर्वात प्रभावशाली देश — नितीन गोहने

पेंढरी मक्ता येथे सांस्कृतिक महोत्सव मोठया उत्साहात साजरा

संविधानामुळेच भारत जगात सर्वात प्रभावशाली देश — नितीन गोहने

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर:-सावली तालुक्यातील मौजा.पेंढरी मक्ता येथे ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेंढरी मक्ता येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून माजी सदस्या जि.प.चंद्रपूर सौ.मनीषाताई चिमूरकर,सह उदघाटक सरपंच पेंढरी मक्ता सौ.तुमादेवी वलादे,तर अध्यक्ष म्हणून सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास करण्यासाठी व त्यांच्यात शिस्त, त्याग, सेवा, सत्य, अहिंसा व शिल इ. मुल्यांची रुजवणुक करण्याकरिता जि. प. उच्च प्राथ. शाळा पेंढरी मक्ता च्यावतीने शालेय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारला केलेले होते.*

*या कार्यक्रमा निमित्याने माजी सरपंच पेंढरी मक्ता मा.वसंत पाटील अल्लुरवार,पत्रकार मा.लखन मेश्राम,ग्रामपंचायत सदस्य पेंढरी मक्ता सौ.अंजुताई बोरेवार,मा.वैभव कोरगांदेवार,सौ.वैशाली भोयर, गाव तंटामुक्ती अध्यक्ष सौ.सुनीता गावडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.संतोष गावडे,उपाध्यक्ष सौ.प्रतिभा गंडाते, सदस्य मा.सुभाष इरमवार,सौ.प्रतिभा मडावी,सौ.सुनीता मोहुर्ले,मा.किशोर कस्तुरे,सौ.जास्वंदा गेडाम,मा.साईनाथ शेडमाके आदी उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here