Home चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्र्पुर :-चंद्र्पुर शहर महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७:५० वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

सकाळी ७.४० वाजता महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केल्यावर सकाळी ७.५० वाजता महानगरपालिका कार्यालयाच्या इमारतीवर आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजास ध्वजारोहण व मानवंदना देण्यात आली. यावेळी आयुक्त यांनी सर्व विभागाचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरु असुन गतिमान प्रशासनासाठी नियोजनबद्ध कार्य करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.चंदन पाटील, उपायुक्त श्री. अशोक गराटे,उपायुक्त श्री.,मंगेश खवले,सहायक संचालक नगर रचना श्री.सुनील दहिकारी,मुख्य लेखा अधिकारी श्री.मनोहर बागडे. मुख्य लेखा परीक्षक श्री. मनोज गोस्वामी,शहर अभियंता श्री.अनिल घुमडे,उपअभियंता विजय बोरीकर,सहायक युक्त श्री.नरेंद्र बोबाटे,संतोष गर्गेलवार,सचिन माकोडे,उपअभियंता रवींद्र हजारे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स चंद्रपूर, प्रभाग कार्यालय क्रमांक – २ कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक,प्रभाग कार्यालय क्रमांक – ३ देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा, बंगाली कॅम्प येथे सहायक आयुक्तांच्या हस्ते तसेच जटपुरा गेट समोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास आयुक्त यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. सकाळी ८.२५ वाजता हुतात्मा स्मारक वाचनालय सिविल लाइन्स येथे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here