Home Breaking News फक्त हिंदू राष्ट्र नाही तर सर्व समानतेचे राष्ट्र पाहिजे : ॲड. मेघा भाले

फक्त हिंदू राष्ट्र नाही तर सर्व समानतेचे राष्ट्र पाहिजे : ॲड. मेघा भाले

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बल्लारपूर येथे महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभ

बल्लारपूर  :-  26 जानेवारी 2024, धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करताना  संविधानाला बगल देता येत नाही. हिंदू राष्ट्र नाही तर सर्व समानतेचे राष्ट्र पाहिजे, असे प्रतिपादन शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले यांनी केले.

बल्लारपूर येथील मंगलमूर्ती लॉन येथे काँग्रेस नेते दिनेश दादापाटील चोखारे  यांचे संकल्पनेतून महिला काँग्रेस च्या वतीने महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद, शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले, शहर सचिव ममता चंदेल यांच्या माध्यमातून महिला मेळावा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बल्लारपूर नगर पालिकेच्या माजी नागराध्यक्ष्या छाया मडावी, ॲड.किरण साव, माजी सदस्या अकूबाई बुक्कार , संगिता येल्लावर, वर्षा कडू, सीमा आंबाडे, बेबी केसकर, याची  उपस्थित होते.पुढे बोलतांना ॲड. मेघा भाले म्हणाल्या कि, महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो , सर्वानी मिळून मिसळून राहणे गरजेचे आहे. आज आपण एकत्र राहिल्यास कुणाचीही हिंमत नाही महिलांवर अत्याचार करण्याची, सावित्री माई ने आपल्याला शिशिक्षणाची दारे उघडून दिली आहे.

त्याचा आपण सर्वानी लाभ घेतला पाहिजे. श्रीराम हे सर्वांचे आहे. पण ह्यांनी रामाला आपल्या ब्रँड बनवले आहे. रामाचा वापर स्वतःचे प्रचारासाठी करत आहे. त्यांनी विविध विषयावर यावेळी प्रकाश टाकला. महिला काँग्रेस च्या वतीने महिलांच्या साठी विविध उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असतात ,महिलांना सक्षम करण्यासाठी  आम्ही नेहमीच पुढाकार घेत असतो ,त्यामुळे आपल्या भागातील महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर आम्ही तुमच्या सोबत कायम आहोत असा विश्वास ही  काँगेस कमिटीच्या महिला तालुका अध्यक्ष अफसाना सय्यद त्यांनी यावेळी दिला.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये अनेकांना यश मिळवले. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील महिलांनी मोट्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अफसाना सय्यद, ॲड. मेघा भाले, ममता चंदेल, संगिता येल्लावर, वर्षा कडू, सीमा आंबाडे, बेबी केसकर, किरण बलखंडे, निशा लोखंडे, प्रिया गेडाम, परिणीती गायगोले, सीमा हंबर्डे आदी महिलांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here