Home भद्रावती संतापजनक :- कर्नाटका एम्टा(kpcl) कोळसा खाणीत प्रकल्पग्रस्तमहिला घेणार जलसमाधी?

संतापजनक :- कर्नाटका एम्टा(kpcl) कोळसा खाणीत प्रकल्पग्रस्तमहिला घेणार जलसमाधी?

महसूल प्रशासन व कपंनी प्रशासन यांनी महिलांच्या आंदोलनाला केले बेदखल. दोन दिवसापासून महिलांचे अन्नत्याग आंदोलन सुरूच.

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती तालुक्यातील कर्नाटका एम्टा (kpcl ) कंपनीच्या कोळसा खाणीत दहा महिला उतरून अन्नत्याग आंदोलन करत असताना व काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस व गारपीट अंगावर झेलून सुद्धा अन्नाचा एकही कण न खाता आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या महिलांची दखल महसूल विभाग व कंपनी व्यवस्थापन घेत नसल्याने आता त्या महिला स्वतःला कोळसा खाणितील पाण्यात जलसमाधी घेण्याच्या तयारीत आहे मात्र तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतं आहे. दरम्यान उपवीभागीत अधिकारी लंगडापुरे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली खरी पण कुठलाही निर्णय व तोडगा निघाला नसल्याने त्या महिलांनी जलसमाधी घेतली तर यासाठी कोण जबाबदार राहणार? हा प्रश्न उभा राहत आहे.

मागील दोन महिन्यापासून kpcl कंपनीच्या कोळसा खाणी समोर आमरण उपोषणला बसलेल्या बरांज या गावातील महिलांच्या आंदोलनाची दखल स्थानिक व जिल्हा प्रशासनाने घेतली नसल्याने व कंपनी व्यवस्थापन कुठलीही तडजोड करायला तयार नसल्याने महिलांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात एल्गार पुकारून व कोळसा खाणीच्या पाण्यात उतरून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे, दरम्यान तीन दिवसापूर्वी पहाटे कर्नाटका एम्टा (kpcl ) च्या तीन कोळसा खाणीत तब्बल 30 ते 35 महिला उतरल्या होत्या व त्यांनी कोळसा खाणीत आंदोलन सुरु केले होते त्यापैकी एका कोळसा खाणीत दहा महिला अजूनही अन्नत्याग आंदोलन करून प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या म्हणून आवाहन करत आहे परंतु कंपनी व्यवस्थापनाने दखल न घेता त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही त्यामुळे कोळसा खाणीच्या पाण्यात महिलांनी जलसमाधी घेण्याची घोषणा केली असल्याने कधीही अनुचित प्रकार घडू शकतो त्यामुळे या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावी व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन मध्यस्थी करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या माध्यमातून केल्या जातं आहे.

कुठे गेले राजकीय नेते व लोकप्रतिनिधी?

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात ज्या पद्धतीने अनेक राजकीय पक्षाचे नेते विधानसभा व लोकसभा निवडणूकीची तयारी करताना दिसत असून कबड्डी, क्रिकेट, हॉलिबॉल क्रीडा स्पर्धा व जयंती पुण्यतिथी तथा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करत आहे जे खऱ्या अर्थाने राजकीय नेत्यांचे काम नाही पण जिथे महिलांवर अन्याय होतं आहे, त्यांचे परिवार उध्वस्त होतं आहे तिथे त्यांना आधार देऊन त्यांच्या बाजूने लढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असताना नेमके ते राजकीय नेते व लोकप्रतिनिधी गेले कुठे ? असा प्रश्न बरांज गावातील महिलांना पडला आहे. बिचाऱ्या महिलानी स्वतःच्या पतीना बाजूला करून आंदोलनाची सूत्रे हातात घेतली व प्रशासनासोबत लढत आहे त्या महिलांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय पोळ्या राजकीय नेते मंडळी शेकत आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून येणाऱ्या निवडणुकीत या सर्व नेत्यांना येथील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे.

भाजप नेते रमेश राजूरकर कुणाचे प्रश्न सोडवत आहे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असताना जनतेचे प्रश्न सोडवता येत नाही म्हणून सत्ताधारी भाजप मध्ये प्रवेश करणारे व वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे भाजप नेते रमेश राजूरकर हे नेमके कुणाचे प्रश्न सोडवत आहे हेच कळायला मार्ग नसून त्यांचा गावागावात वावर होतांना दिसतो पण जिथे जनतेचे प्रश्न उभे राहतात तिथे मात्र हे गायब असतात मग यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजप मध्ये प्रवेश केला का? की आपली राजकीय दुकानदारी भाजप मध्ये यशस्वी होते मम्हणून ते भाजप मध्ये गेले? हा प्रश्न निर्माण होतं आहे, जिथे सत्ताधारी भाजपा हा गंभीर प्रश्न सोडवू शकतो कारण त्यांची केंद्रात व राज्यात सत्ता आहे, पण रमेश राजूरकर यांच्याकडे वरोरा भद्रावती या विधानसभा क्षेत्राची जबाबदारी भाजप ने दिली असताना ते जाणीवपूर्वक बरांज गावातील महिलांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असेल तर मग हे खरोखरोच आमदार झाल्यावर जनतेचे प्रश्न सोडवणार का? असा प्रश्न उभा राहत आहे.

Previous articleखळबळजनक :- कर्नाटका एम्टा(kpcl) कोळसा खाणीत प्रकल्पग्रस्त महिलां सामूहिक आत्मदहन करण्याच्या मार्गांवर.
Next articleआक्रोश :- अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here