Home Breaking News चंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी महामंत्रीपदी तब्बल दुसऱ्यांदा शुभम गेडाम, यांची...

चंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती आदिवासी महामंत्रीपदी तब्बल दुसऱ्यांदा शुभम गेडाम, यांची निवड

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर महानगर भाजपा अनुसूचित जमाती (आदिवासी) मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती आदिवासी महामंत्रीपदी तब्बल दुसऱ्यांदा शुभम गेडाम, यांची निवड

जिल्हाध्यक्ष धनराज कोवे यांनी केली घोषणा

चंद्रपूर  :-  भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर अंतर्गत असलेल्या अनुसूचित जमाती (आदिवासी) मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष धनराज कोवे यांनी जाहीर केली आहे. पक्षांमध्ये नेहमीच जुण्या कार्यकर्त्यांची आणि मेहनती निष्ठावंत व इमानदारीने स्वतःचे कोणतेही हित न ठेवता समाजकार्य करणाऱ्या आणि लोकांच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून येणाऱ्या सदैव पक्षाच्या काम असो अथवा समाजाच्या कामासाठी सक्रिय राहणारे तडफदार असे युवा नेते शुभम गेडाम यांना पुन्हा एकदा अनुसूचित जमाती आदिवासी कार्यकारिणीत महामंत्रीपदी शुभम गेडाम, यांना देण्यात आले आहे.

अरविंद मडावी, किशोर आत्राम, यशवंत सिडाम, अनिल सुरपाम, विक्की मेश्राम यांना संधी मिळाली आहे. उपाध्यक्ष म्हणून नविन चांदेकर, धिरज बोरीकर, अनिल सिडाम, माणिक सोयाम, प्रकाश आत्राम, सोमाजी कातलाम, नागेश्वर कुळमेथे, नकुल उईके, तर सचिव पदी रामु मसराम, सतिश मेश्राम, अरविंद नन्नावरे, अरविंद तुमराम, ईश्वर शेडमाके, विशाल मरस्कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार,

रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम, सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleक्राईम :- वणी तालुक्यातील मौजा-शिंदोला-२ घाटातून बेकायदेशीर रेती वाहतूक व विक्री.
Next articleअर्थसंकल्पात बेरोजगार युवक, शेतकरी, जनसामान्यांकरीता कुठले स्थान नाही: चोखरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here