Home चंद्रपूर खळबळजनक :- पालकमंत्री मुनगंटीवार यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीत उतरविल्याने खळबळ?

खळबळजनक :- पालकमंत्री मुनगंटीवार यांना भाजपाने लोकसभा निवडणुकीत उतरविल्याने खळबळ?

हंसराज अहिर यांच्या समर्थकामध्ये संताप, डॉ अशोक जीवतोडे यांच्या समर्थकांची पण नाराजी l.

चंद्रपूर :

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चार वेळचे खासदार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा संताप व्यक केल्या जातं तर लोकसभा निवडणुकीत मलाच उमेदवारी मिळेल यासाठी मोठी तयारी करीत असलेल्या डॉ अशोक जीवतोडे यांच्या समर्थकात मोठी नाराजी पसरली आहे.

खरं तर लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्यानंतर व लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप दुसरी यादी प्रकाशित करेल अशी अपेक्षा होती मात्र आचारसंहिता लागण्यापूर्वीच भाजपाने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली. लोकसभा निवडणूक लढण्याची मुळीच इच्छा नाही, मात्र पक्षाने आदेश दिला तर रिंगणात उतरणार, असे मुनगंटीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. मंगळवारी विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली होती की, मला लोकसभा लढायची नाही, आता तुम्हीच मला राज्यात थांबविण्यासाठी प्रयत्न करा. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठींनी मुनगंटीवार यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीने त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांमध्ये मात्र नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे,

चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा क्षेत्रात भाजपच्या तिकिटावर आपल्यालाच उमेदवारी भेटेल याकरिता पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडे पायपीट करणारे माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व बहुजन समाजाचे आपणच नेतृत्व करतोय व ओबीसी आंदोलनात आपली भूमिका पक्षांच्या वरिष्ठानी समजून घेतल्याने आपणांस भाजप उमेदवारी देईल अशी आशा डॉ अशोक जीवतोडे यांना होती परंतु भाजप च्या अंतर्गत सर्व्हेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाच पहिली पसंती मिळाल्याने भाजप श्रेष्ठिने त्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवून मोठी खेळी केली आहे, दरम्यान कुणबी ओबीसी पट्ट्यात अल्पसंख्यांक मुनगंटीवर यांना खरेच लोकसभा निवडणुकीत मतदान होईल का? आणि नाराज असलेले हंसराज अहिर व अशोक जीवतोडे हे मुनगंटीवार यांना साथ देईल का? हे येणाऱ्या निवडणूकीच्या रनधुमाळीत ठरविणार आहे.

चंद्रपूर लोकसभेत मुनगंटीवारच का?

मुनगंटीवार १९८७-८८ सालापासून राजकारणात सक्रिय आहेत. १९८९ या वर्षी मुनगंटीवार यांनी चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविली होती. मात्र, काँग्रेसचे माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९१ या वर्षी मुनगंटीवार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तेव्हा देखील काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनीच मुनगंटीवार यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. आर्य वैश्य (कोमटी) या अल्पसंख्याक समाजातून येणारे मुनगंटीवार यांना लोकसभेची पायरी चढणे कठीण आहे, हे लक्षात येताच त्यांनी १९९५ मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी राज्याचे माजी राज्यमंत्री, काँग्रेस नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुनगंटीवार यांनी राजकारणात कधीच मागे वळून पाहिले नाही. एकेक करून पायऱ्या चढत गेले. १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक विभागाचे मंत्री झाले. त्यानंतर २००४, २००९, २०१४, २०१९ अशा सलग निवडणुका जिंकल्या. मतदार संघ पुनर्रचनेत मागील तीन विधानसभा निवडणुकीत त्यांनी बल्लारपूर मतदार संघातून निवडणूक लढवून विजय संपादन केला. राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थखात्याचे मंत्री तसेच वनमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी काम केले. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले आहे. राजकीय कार्यात जमिनी कार्यकर्ता म्हणून जनतेच्या सेवेत सैदव कार्यरत असणारे व त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे समाधान करणारे सुधीर मुनगंटीवर यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे, जातीच्या पलीकडे जाऊन जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन प्रसंगी मंत्रालय पालथे घालणारे सुधीर मुनगंटीवार हे कार्यक्षम उमेदवार म्हणून भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर आल्याने त्यांना लोकसभेची उमेदवारी पक्षाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here