Home महाराष्ट्र राजकीय कट्टा :- तात्या आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा?

राजकीय कट्टा :- तात्या आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा?

पक्ष संपत नसतो, पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात गेले तर ते संपतात हा इतिहास आहे.

न्यूज नेटवर्क :-

मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली खरी परंतु, गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या वागणुकीमुळे वसंत मोरे (Vasant More) हे नाराज होतेअशी माहिती आहे, त्यांचे म्हणणे होते की आपल्याला पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना आमंत्रित केले जात नव्हते, डावलले जात होते आणि ही खंत वसंत मोरे यांनी अनेकदा बोलूनही दाखवली होती. त्यामुळे अखेर आज त्यांनी सोशल मीडियावरुन मनसेला रामराम ठोकत असल्याचा निर्णय जाहीर केला. पुण्यातील राजकीय वर्तुळात वसंत मोरे यांना ‘तात्या’ या नावाने ओळखले जाते. तात्यांच्या राजीनाम्याने मनसेच्या अंतर्गत गोटात भूकंप आला असल्याच्या बातम्या प्रसारामध्यमात प्रसारित होतं आहे. पण वसंत मोरे यांनी पक्ष सोडण्यापूर्वी वरिष्ठाकडे ही बाब मांडली असावी, मात्र त्यांनी त्या संदर्भात तात्काळ भूमिका घेऊन ज्या पद्धतीने मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तो दुसऱ्या पक्षातील ऑफर असल्यामुळं दिला असावा अशी शंका निर्माण होतं आहे.

वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचे सांगितले. आतापर्यंत मनसेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फेसबुक आणि व्हॉटसअॅपवर माझ्याकडे राजीनामे पाठवले आहेत. पण मी कोणावरही पक्ष सोडण्याची सक्ती केलेली नाही. हा वसंत मोरेवर झालेला अन्याय आहे, असे त्यांना वाटत आहे. तरीही मी या सगळ्यांना कोणीही पक्षसंघटना सोडू नका, असे सांगितले आहे. यापुढे पक्ष सोडायचा की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे वसंत मोरे यांनी म्हटले. पुण्यातील मनसेच्या कार्यकारिणीने राज ठाकरेंना चुकीचा रिपोर्ट दिला असल्याचा आरोप पण केला. मनसे पुणे लोकसभा मतदारसंघात लढू इच्छित नाही, ही धक्कादायक बाब आहे. पुण्यात मनसेची ताकद नाही, असे वातावरण पक्षाच्याच नेत्यांनी तयार केले. राज ठाकरे पुण्यात आले होते त्यापूर्वी काही नेत्यांनी शाखाध्यक्षांच्या मिटींग घेतल्या. त्यांना सांगण्यात आले की, राज ठाकरेंनी तुमची बैठक घेतली तर त्यांना सांगा शहरात जेमतेम वातावरण आहे. मनसेने निवडणूक लढवण्यासारखे वातावरण नाही. मनसैनिकांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे, पण नेत्यांना नाही. त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांकडून मुंबईला चुकीचा अहवाल पाठवण्यात आला, असा आरोप वसंत मोरे यांनी केला. पुणे मध्ये मनसेची ताकत नाही असे म्हणणे चुकीचे आहे, कारण नव्या पिढीचा अनेक तरुण कार्यकर्त्यात मोठा उत्साह आहे आणि मनसेच्या अनेक अंगीकृत संघटना चांगले काम करत आहे, दरम्यान नुकताच पुणे येथे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता व राज्यातील सरपंच उपसरपंच व सदस्याना राजसाहेब ठाकरे यांनी मार्गदर्शन केले होते.पक्षात नवीन कार्यकर्त्यांची जी चढाओढ सुरु आहे त्यात जुने असलेले नेते स्वतःहून मागे पडत आहे का? हा प्रश्न आहे, कारण जो नेता ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याला खरं तर पक्षात पक्षातील वाद महत्वाचा नसतो, काही वेळा स्थानिक राजकारण यात अडथळे निर्माण करतात ते खरे आहे पण ज्या नेत्यांनी आपल्याला ओळख दिली त्या राजसाहेब ठाकरे यांचा विचार न करता केवळ आपसातील गुडबाजी आहे म्हणून पक्ष सोडणे म्हणजे तात्या मोरे कुठेतरी आपला स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवत आहे का? अशी शंका आहे.

मनसे सोडून जाणाऱ्यांचे काय झाले?

पक्ष संपत नसतो, पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात गेले तर ते संपतात हा इतिहास आहे. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथे कार्यकर्त्यातून अनेक नेते तयार झाले, दरम्यान पुणे जिल्ह्यातील मनसेच्या अँड रुपालीताई ठोंबरे ह्या एकेकाळी फायरब्रँड नेत्या होत्या पण जेंव्हा त्यांनी मनसे सोडली आणि त्यानंतर त्यांची अधोगती झाली आणि त्या राजकारणातून गायब झाल्या, मुंबई मध्ये नितीन नांदगावकर हे एकेकाळी मनसेचे मोठे नेते म्हणून ओळखल्या जायचे पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांची राजकीय दुकानादारी संपुष्टात आली, त्यानंतर शिशिर शिंदे असेल किंव्हा मुंबईचे अनेक नेते असेल ज्यांनी ज्यांनी मनसे सोडली त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले, त्यामुळे वसंत तात्या मोरे यांनी परत विचार करावा केवळ दुसऱ्या पक्षात संधी आहे म्हणून पक्ष बदलवायचा व ज्या पक्षांनी आपल्याला मोठे केले त्या पक्षावर आरोप करायचे हे तात्या फार दुःखद गोस्ट आहे, महाराष्ट्रात ज्या पद्धतीन राजकारण सुरु आहे त्यात मनसेच असा राजकीय पक्ष ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे म्हणून परत तात्यांनी विचार करावा अशी संपूर्ण महाराष्ट्र सैनिकांची अपेक्षा आहे. कारण पक्ष संपत नसतो, पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात गेले तर ते संपतात हा इतिहास आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here