Home चंद्रपूर चिंतनीय :- भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या त्या विधानाचा अर्थ कळला का?

चिंतनीय :- भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या त्या विधानाचा अर्थ कळला का?

स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्तेनंतर उसळलेल्या 1984 च्या दंगलीत घडलेल्या प्रकारातील आला संदर्भ.

अर्धवट व्हिडीओ दाखवून जनतेच्या मनात भ्रम निर्माण कारण्याचं कांग्रेस चं छडयंत्र 

चंद्रपूर :-

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत आता प्रचाराची रनधुमाळी सुरु असतांना काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोरवा येथे मोठी सभा झाली, त्या सभेत बोलताना भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार 1984च्या दंगलीचा संदर्भ देत म्हणाले होते की ” एका सख्या भावाला एका सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून खाटेवर झोपविणारे हे कांग्रेशी देशाचे तुकडे तुकडे करत होते. ” हा संदर्भ त्यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्तेनंतर उसळलेल्या दंगलीतील प्रकाराबद्दल दिला होता, मात्र त्या विधानाचा विपर्यास करून कांग्रेस च्या काही तथाकथित नेत्यांनी व त्यांच्या चेलेचपाट्यानी अर्थाचा अनर्थ केला व सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांचा अपमान केला, भाऊ बहिणीच्या नात्याला काळिमा फासली असल्या प्रकारचे आरोप करून त्यांचा निषेध केला, खरं तर सुधीर मुंगनटीवार सुसंस्कृत नेते आहेत, व त्यांनी 1984 चा संदर्भ जोडला होता,  सुधीर मुनगंटीवार यांनी या अगोदर कधीही कुठल्या महिलेबद्दल अपशब्द काढले नाही की कुण्या स्त्री जातीला अपमानित केले नाही, त्यामुळे त्यांच्याकडुन जाणीवपूर्वक भाऊ बहिणीबद्दल अपशब्द काढले जाईल यावर कुणी विश्वास ठेवेल असे वाटतं नाही, पण त्यांच्या विधानाचा अर्थ भाजप विरोधी व कांग्रेस च्या लोकांना कळला नाही त्यामुळे त्या वाक्याचा विपर्यास करून त्यांना बदनाम करण्याचे छडयंत्र काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहे आणि त्याला राजकीय रंग देत आहे ते सामाजिक आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे.

स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्तेनंतर 1984 मध्ये जी शीख दंगल झाली, त्याला खरंतर नरसंहार म्हटलं पाहिजे असं वक्तव्य प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजने केलं आहे. दिलजीत ‘जोगी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1984 मध्ये झालेल्या शीख दंगलीवर आधारित आहे. दिलजीतचा जन्म त्याच वर्षी जानेवारी महिन्यात झाला होता. त्या दंगलींबद्दल ऐकूनच मी लहानाचा मोठा झालो असं तो म्हणाला होता.

31 ऑक्टोबर 1984 रोजी जेव्हा देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्याच शीख बॉडीगार्डने केली, तेव्हापासून देशात या दंगली सुरू झाल्या. त्यावेळी देशभरात असंख्य शीखांची हत्या झाली होती. देशातील अनेक भागांमध्ये त्यावेळी दंगली घडल्या होत्या. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘जोगी’ या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीख समुदायाविरोधात उठलेल्या हिंसेची कथा मांडण्यात आली आहे. त्यावेळी सर्वाधिक हिंसाचाराच्या घटना या दिल्लीत घडल्या होत्या. स्वत:च्या घरातही शीख त्यावेळी सुरक्षित नव्हते, त्यांच्या घरात घुसून त्यांचे कपडे काढून त्यांच्या हत्त्या करण्यात आल्या, त्यावेळी घरात असलेल्या भाऊ, बहीण यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना झोपवून त्यांचे हाल करण्यात आले, याविषयी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत दिलजीत म्हणाला, “त्या घटनेला आपण दंगल म्हणू नये. किंबहुना त्या घटनेसाठी सर्वांत योग्य शब्द म्हणजे नरसंहार. जेव्हा दोन्ही बाजूंनी लढाई केली जाते, तेव्हा त्याला आपण दंगल म्हणू शकतो. माझ्या मते त्या घटनेला नरसंहार म्हटलं पाहिजे. असं नाही की ती घटना फक्त एक-दोन किंवा काही लोकांसोबत घडली होती. ती घटना सामूहिकरित्या आम्हा सर्वांसोबत घडली होती.” असेही त्यांनी म्हटले आहे, दरम्यान ह्या चित्रपटाचा हवाला देत सुधीर मुनगंटीवार यांनी ” एका सख्या भावाला एका सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून खाटेवर झोपविणारे हे कांग्रेशी देशाचे तुकडे तुकडे करत होते असे विधान केले होते, मात्र त्यांनी हे बोलताना 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ जोडला तरीही त्यांच्या विधानाचा विपर्यास करून कांग्रेसची मंडळी मुनगंटीवार यांना बदनाम करत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा अर्धवट व्हिडीओ दाखवून अपप्रचार?

भाजप उमेदवार मुनगंटीवार आपल्या भाषणात शीख दंगली संदर्भात बोलताना म्हटले होते की ” एका सख्या भावाला, एका सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून खाटेवर झोपविणारे हे कांग्रेशी देशाचे तुकडे तुकडे करत होते. याबद्दल 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या हत्तेनंतर ज्या दंगली झाल्या त्या दंगलीत कांग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शिखाच्या घरात घुसून शीख कुटुंबाची काय अवस्था केली त्याचा संदर्भ त्यांनी दिला होता, त्या दरम्यान कांग्रेस च्या लोकांनी दंगलीत शीख परिवारातील सदस्याना ठार मारले, काही पुरुषांना व महिलांना निर्वस्त्र करून त्यांची नसबंदी केली, घरातील भाऊ बहीनींना सुद्धा कपडे काढून खाटेवर झोपविण्यात आले होते या बाबी त्यांनी नमूद केल्या पण अर्धवट व्हिडीओ दाखवून जनतेत सुधीर मुनगंटीवार यांचा अपप्रचार केल्या जातं आहे, खरं तर त्यात त्यांनी हे म्हटलं नाही की भाऊ बहीण कपडे काढून एकत्र झोपले, तर त्यांनी म्हटले त्या दंगलीत दंगलखोरांनी घरात घुसून भाऊ बहीण यांना निर्वस्त्र करून खाटेवर झोपवले व देशात जातीय धार्मिक विभाजन केलं, पण 1984 च्या दंगलीचा संदर्भाचा विपर्यास करून भाजप विरोधी हे त्यावर  राजकीय पोळ्या शेकत आहे जे सामाजिक आरोग्यास धोकादायक ठरत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here