Home गडचिरोली देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र – विरोधी पक्षनेते विजय...

देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रचार सभेत नेते हटाव… गडचिरोली बचावचा नारा हुकुमशाहीतून देश व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधन्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

देशाच्या लोकशाहीचे कवच असलेले संविधानाला बदलविण्याचे भाजपचे षडयंत्र – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

प्रचार सभेत नेते हटाव… गडचिरोली बचावचा नारा

हुकुमशाहीतून देश व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधन्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर
गडचिरोली:-देशांतील महत्त्वपूर्ण प्रकल्प विकले गेले असुन दोन विकणारे व दोन घेणाऱ्यांनी देशाला उधवस्त करण्याचें कार्य चालविले आहे. देशांत प्रचंड महागाई, व बेरोजगारी यात जनता भरडली जात असताना देशावर वाढलेले कर्ज, देशाच्या अर्थव्यवस्थेचे झालेले वाटोळे यावरून जनतेचे लक्ष विचलित करीत धर्मांधता व जाती -जाती मध्ये विष पेरून भांडणे व दंगलीचे वातावरण तयार करण्यात येत आहे. या हुकुमशाही भाजप कडून आता देशाच्या लोकशाहीचे संरक्षण कवच असलेल्या पवित्र संविधानाला आता समूळ नष्ट करण्याच्या हेतूने षडयंत्र चालविले जात असून मतदारांनो तुम्ही गाफील राहिल्यास पुढील काळात आपण सर्व बहुजन बांधवांना गुलाम म्हणून जगावे लागेल.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गडचिरोली जिल्हयातील चित्तरंजनपूर (येणापुर) येथे इंडिया आघाडी प्रणित, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेस मार्गदर्शन बोलतं होते.
आयोजित सभेस माजी खासदार मारोतराव कोवासे, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट), महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत, युवक काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, प्रमोद भगत, बिजम सरकार, के. डी. मेश्राम, अश्विनी कुंभरे, रतन अक्केवार, सुधाकर गद्दे, प्रेमानंद मल्लिक, विकास पोतराजवार, स्वाती टेकाम, नीलकंठ निखाडे, निकेश गद्देवार, निनाद देठेकर, रुपाली निखाडे तसेच महाविकास आघडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या 10 वर्षा पूर्वी सत्तेत आल्यावर भाजपने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड दरवाढ करून अर्थिक शोषणातून जनतेला लुटण्याचे काम केले. देशांत महीला अत्याचार, गुन्हेगारी यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. व्यापारी हित जोपासणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगराखाली दाबून बड्या व्यापाऱ्यांना कर्ज माफी दिली. तर स्थानिक उद्योगांमध्येही भूमिपुत्रांची अवहेलना केली. देश बुडविनाऱ्यांनी आता अब की बार 400 पार नारा देऊन देशाचे संविधान बदलाविण्याचा घाट रचला आहे. मतदारांनो आता देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीच एकमेव पर्याय उरला असून इंडीया आघाडीच्या डॉ. नामदेव किरसान यांना विजयाचा आशीर्वाद देत प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
सलग 10 वर्षे खासदार म्हणुन संधी मिळूनही संसदेत मौन धारण करून क्षेत्रातील शेतकऱ्यांचे, नागरिकांचे, महिलांचे, युवा- युवतींचे प्रश्न सोडविण्यात सपेशल अपयशी ठरणाऱ्या निष्क्रिय खासदाराचा जनतेला काय उपयोग..? असा सवाल उपस्थित करीत इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या वर निशाणा साधला.तर संविधानावर घाला घालुन मनुस्मृति विचारांचे हुकुमशाही सरकार चालवू पाहणाऱ्यांना व त्यांना साथ देणाऱ्यांना समाजाने बहिष्कृत करून महाविकास आघाडीलाच संविधान वाचविण्यासाठी अमूल्य मत द्या. असे आवाहन भारिप जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत व रीपाई नेते ॲड. राम मेश्राम यांनी केले.तर महागाईने गरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारला पाय उतार करा.असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) अतुल गण्यारपवार यांनी केले. या प्रसंगी चित्तरंजनपूर (येनापुर) व परिसरातील महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख, व हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here