सायबर क्राईम ला तक्रार, जनतेत मुनगंटीवार यांची बदनामी व संभ्रम निर्माण केल्या प्रकरणी होणार कारवाई.आरोपीना शोधण्याचे पोलिसासमोर आव्हान.
चंद्रपूर :-
राजकारणात आरोप प्रत्यारोप हा नित्याचाच विषय असतो त्यात निवडनुका आल्या की प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांच्या चुका शोधून त्यावर प्रहार करतात, पण देशपातळीवरच्या विषयावर भाष्य केल्यानंतर स्थानिक स्थरावर त्या भाष्य करणारा व्हिडीओचे अर्धवट चित्रण सामाजिक माध्यमावर दाखवून महिलांचा अपमान झाल्याचा देखावा करणे व ते भाष्य करणाऱ्या उमेदवाराला बदनाम करणे म्हणजे तो एक प्रकारचा गुन्हा आहे, दरम्यान भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा 1984 च्या शीख दंगलीचा संदर्भ देत जो व्हिडीओ सामाजिक माध्यमावर व्हायरलं होतं आहे तो अर्धवट असून त्यातुन जनतेला चुकीचा संदेश जातं आहे आणि त्यातून सुधीर मुनगंटीवार यांना बदनाम केल्या जातं आहे त्यामुळे भाजप कडून या संदर्भात तो अर्धवट व्हिडीओ व्हायरलं करणाऱ्यांविरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी होणार असल्याची माहिती आहे.
8 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूरमध्ये झालेल्या सभेला मुनगंटीवार यांनी संबोधित करतांना म्हटलं होतं की कांग्रेस ज्या पद्धतीन भाजप विरोधात प्रचार करताहेत की भाजप ची सत्ता पुन्हा आली तर देशात हुकूमशाही येईल तर मग कांग्रेस ने 1977 च्या आणीबाणी वेळी काय केलं व 1984 च्या शीख दंगली च्या वेळी कांग्रेस ने शीख समुदयावर किती अत्याचार केला हे सांगावं असे आव्हान करून त्यानी दंगली चा प्रसंग सांगताना म्हटलं की कांग्रेस च्या लोकांनी शीख समुदयाच्या घरात घुसून महिला पुरुष यांना ठार मारले त्यावेळी एका सख्ख्या भावाला एका सख्ख्या बहिणीसोबत खाटेवर विवस्त्र झोपविण्यात आले, खरं तर राजकारणात इतिहासातील हे संदर्भ येत असतात, गोधरा कांड सुद्धा असंच जळजळीत कांड होतं, याचा कांग्रेस नेत्यांनी अनेक वेळा उल्लेख करून भाजप ला घेरलेलं आहे, पण त्या एखाद्या घटनेच्या विधानाचा राजकीय लाभ घेण्यासाठी कुणाचं चरित्र्य हनन होतं असेल तर तो गुन्हा आहे, त्याला राजकीय मान्यता मिळू शकत नाही त्यामुळे जनतेत भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने जो अर्धवट व्हिडीओ व्हायरलं करण्यात येत आहे, तो व्हायरलं करणाऱ्या सर्वावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप कडून करण्यात येत आहे.