Home चंद्रपूर लक्षवेधक :- चंद्रपूर लोकसभा निवडणूक आता “विकास विरुद्ध विनाश” यावर होणार?

लक्षवेधक :- चंद्रपूर लोकसभा निवडणूक आता “विकास विरुद्ध विनाश” यावर होणार?

धानोरकर यांच्या दारू व इतर व्यवसायातील भ्रष्ट पैशाच्या विरोधात भाऊचा विकास भारी पडणार? चर्चेला उधान

चंद्रपूर :-

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणूक आता एका नव्या वळणावर येतांना दिसत असून एरवी कांग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत असतांना आता ती उमेदवार बघून होतांना दिसत आहे, सुरुवातीला कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्याप्रती सहानुभूती राहील अशी शक्यता होती, परंतु ज्या पद्धतीने प्रचार पुढे सरकत आहे व धानोरकर यांच्या अवैध मार्गाने कामावलेल्या मालमत्तेची चर्चा होतांना दिसत आहे, त्यावरून जनतेत धानोरकर परिवाराविरोधात नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे, कारण धानोरकर परिवाराने टक्क्याचे राजकारण करून व वैध आणि अवैध दारूचे धंद्यातून जी मालमत्ता कमावली ती अनेकांना अचंभीत करणारी ठरत असून दारूच्या व्यसनात तरुण युवक देशोधडीला लागला असतांना धानोरकर परिवाराचा वैध व अवैध दारू धंदा हा सामाजिक विनाशाचे मूळ कारण ठरत असल्याची गंभीर चर्चा आहे, दरम्यान सुरुवातीला धनोजे कुणबी हा फॅक्टर महत्वाचा ठरणार असे बोलल्या जातं होते परंतु भारतीय जनता पक्षात असलेली धनोजे कुणबी समाजाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची संख्या पाहता आता धनोजे कुणबी समाज भाजप उमेदवाराच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे, महत्वाची बाब म्हणजे एकीकडे जिल्ह्याच्या विकासात सुधीर मुनगंटीवार यांचे मोठे योगदान तर दुसरीकडे दारू व अवैध व्यवसायाच्या पैशातून धानोरकर यांनी जमवलेली अपार संमती व समाजासाठी काहीही न केल्याची ओरड यामुळे ही निवडणूक विकास विरुद्ध विनाश अशी होणार असल्याची जनसामान्य जनतेत चर्चा आहे.

कुठलाही लोकप्रतिनिधी जेंव्हा निवडून येतो तो जनतेची सेवा करण्यासाठी व विकास कामे करण्यासाठी, पण धानोरकर यांच्या बाबतीत मात्र चित्र वेगळं आहे, त्यांना जनतेच्या विकासाच्या नावावर स्वतःचा विकास महत्वाचा वाटतो, त्यांना निवडणुकीत कुणबी समाज आठवतो पण त्या कुणब्यांचा सुद्धा त्यांच्या माध्यमातून विकास होतांना दिसत नाही तर त्यांनी ठेवलेले इतर समाजाचे माणसं आहेत त्यांनाच नगरपरिषद च्या कामाचे कंत्राट, सार्वजनिक बांधकाम विभाग, कंपन्या मध्ये सुद्धा यांचीच ठेकेदारी आणि ग्रामपंचायत तथा आमदार खासदार निधीची कामे यांनाच मिळणार अशी परिस्थिती आहे, शिवाय दारूच्या धंद्यासह अवैध रेती कोळशाच्या धंद्यात पण यांचीच मक्तेदारी आहे, त्यामुळे यांच्या प्रापर्ट्या चाळीस पटीने वाढविल्या जातं आहे, पण जनतेच्या पदरात काहीच पडत नाही ही शोकांतीला आहे, त्यामुळे अगदी साडेचार वर्षात आमदार प्रतिभा धानोरकर यांची मालमत्ता चाळीस पटीने वाढण्याचा चमत्कार घडविल्या जातं असतील तर मग त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि समाजासाठी नेमकं काय केलं याचा पण हिशोब लावल्या जायला हवा असा प्रश्न जनसामान्य जनतेत विचारल्या जातं आहे,

खासदार कसा असावा याबाबत चर्चा सुरु असतांना मुनगंटीवार की धानोरकर ह्या लढतीत मुनगंटीवार हे पुढे दिसत आहे, कारण धानोरकर परिवाराने जनतेसाठी भरीव असे काहींही कार्य केलेले दिसत नाही, त्यामुळे ज्या व्यक्तीने आमदार असतांना काहीही विकासाची कार्य केली नाही किंव्हा सामाजिक दृष्ट्या कुठलेही जनकार्य केले नाही तर उलट त्यांच्याकडे नौकरी मागण्यासाठी गेलेल्या तरुणांना दारू विकायचा सल्ला दिला गेला, रेती चोरी करण्याचे सल्ले दिले तर मग यांना खासदार बनवले तर ह्या स्थानिक स्थळी भेटणारच नाही असा कायास मतदार लावत आहे, अर्थातच त्यांच्याकडून समाजाला भरीव असे काहीच देण्यात आले नाही, परंतु समाजातील तरुणांना अवैध व्यवसाय कारण्याचा मार्ग सांगून समाजातील तरुणांना विनाशाकडे घेऊन जाण्याचा त्यांचा मनसूबा दिसत आहे, त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासालाचं कुणबी लोकं पसंती देत असल्याने ही निवडणूक धानोरकर यांच्या दारूच्या पैशा विरोधात भाऊचा विकास अशी होण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here