आमदार किशोर जोरगेवार यांनी केले भारतनत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन आघाडी विभागाच्या महिला शहर प्रमुख विमल काटकर, बहुजन विभागाचे बबलू मेश्राम, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जितेश कुळमेथे, राशीद हुसेन, सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सरोज चांदेकर, चंद्रशेखर देशमुख, किशोर बोलमवार, नीलिमा वनकर, पपीता जुनघरे, कुंदा गोवर्धन, दुर्गा वैरागडे, आशा देशमुख, वंदना वाघमारे, विद्या उपरे, शिल्पा गोंडाणे, पुष्पा दुपारे, वैजयंती मून, जय मिश्रा, आनंद रणशूर करण बैस, सतनाम सिंग मिर्धा, विनोद अनंतवार, सुमित्रा साहू, काजल देवांगण, शिल्पा यादव, शुभांगी डोंगरवार, वैशाली लांडगे आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चंद्रपूरातही त्यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकला माल्यार्पण करुन नमन करत अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्ती होते, म्हणूनच आजचा हा दिवस आपण ज्ञान दिन म्हणून हि साजरा करत आहोत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांनी समाजातील विषमतेवर विजय मिळवला. अस्पृश्यता आणि जातीभेद यासारख्या सामाजिक विकृतींचा प्रखर विरोध करत त्यांनी समाजसुधारणेची चळवळ उचलली. संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ. आंबेडकरांनी भारताला एक आदर्श राज्यघटना प्रदान केली. या घटनेतून सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र आणि बंधुता यांचा अधिकार मिळाला. त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. ही स्थिती चिंताजनक असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
नागपूर नंतर केवळ चंद्रपूर येथेच त्यांनी लाखो अनुयायांना धम्म दिक्षा दिली. नागपूरच्या दिक्षाभुमीचा विकास झाला मात्र चंद्रपूरच्या दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे या दिक्षाभुमीचा विकास करण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरु आहे. 57 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून येथे विकासकामे केल्या जाणार आहे. सोबतच आपण येथे अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असुन 1 लाख पुस्तके येथे असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करत असतांना त्यांनी समाजाला दिलेले विचार आपण अंगीकारले पाहिजे असे ते म्हणाले.