Home चंद्रपूर पोंभुर्णा कॉंग्रेस तालुकाध्‍यक्षाचा भाजपात प्रवेश विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र...

पोंभुर्णा कॉंग्रेस तालुकाध्‍यक्षाचा भाजपात प्रवेश विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र मरपल्‍लीवार

पोंभुर्णा कॉंग्रेस तालुकाध्‍यक्षाचा भाजपात प्रवेश

विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र मरपल्‍लीवार

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. १6 एप्रिल २०२४ : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन विविध संघटनाचा पाठींबा , समर्थन वाढत असून त्‍यांच्‍यावर विश्‍वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.सर्वांगीण विकासाचा वसा घेतलेले ना. मुनगंटीवार यांच्‍या विक्रमी विजयाचा निर्धार करत सोमवार, 15 एप्रिल रोजी कॉंग्रेस कम‍िटीचे पोंभुर्णा तालुका अध्‍यक्ष व बाजार सम‍ितीचे सभापती रविंद्र मरपल्‍लीवार यांनी त्‍यांच्‍या सहका-यांसह भाजपात प्रवेश केला.*

यावेळी बाजार समितीच्‍या संचालक भारती बदन, सुनंदा गोहणे व श्‍यामसुंदर बदन यांच्‍यास अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला . ना. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचा दुपट्टा देऊन सर्वांचे स्‍वागत केले व त्‍यांचा विश्‍वास खरा ठरवण्‍यासाठी दिवसरात्र झटेन, असे आश्‍वासन दिले. यावेळी मोठ्या संख्‍येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्‍थ‍ित होते.

*ना. मुनगंटीवार यांच्‍यावर विश्‍वास – रविंद्र मरपल्‍लीवार*

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांचा विकासाचा वेग पाहून मी आज भारतीय जनता पक्षामध्‍ये प्रवेश केला आहे. विकासासाठी आम्‍ही ना. मुनगंटीवार यांच्‍यासोबत असून त्‍यांच्‍या नेतृत्‍वात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचा विकास होईल, असा विश्‍वास आहे, असे मत रविंद्र मरपल्‍लीवार यांनी व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here