Home गडचिरोली 2024 मध्ये मोदींची हवा नाही…भाजप उमेदवार नवनीत राणा यांची कबूली भाजप...

2024 मध्ये मोदींची हवा नाही…भाजप उमेदवार नवनीत राणा यांची कबूली भाजप सत्ता काळात देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी ,शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका भाजपने जनतेचे बोट जनतेच्या डोळ्यात घातले – डॉ. किरसाण

2024 मध्ये मोदींची हवा नाही…भाजप उमेदवार नवनीत राणा यांची कबूली

भाजप सत्ता काळात देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी ,शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

भाजपने जनतेचे बोट जनतेच्या डोळ्यात घातले – डॉ. किरसाण

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

गडचिरोली– गेल्या दहा वर्षात भाजपने देशाची सर्वत्र लूट चालवून व्यापारी हित जोपासल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. देशाची जनता भाजपला मतदान केले पण आता ही चूक झाली जनतेला कळले आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये मोदींची लाट नाही ही कबुली आता भाजप देत आहे. भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी असे वक्तव्य केले आहे. भाजप सत्ता काळात देशातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार व सर्वसामान्य जनता यांचे जीवन जगणे अवघड झाले असून आता इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीलाच पर्याय म्हणून सर्वत्र जनता कौल देत आहे. ते गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आमगाव, देवरी, व गांगलवाडी येथे आयोजित सभेत मार्गदर्शनपर बोलत होते.

गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील आमगाव व देवरी येथील प्रचार सभेत आ. साहसराव कोरोटे, इंडिया आघाडी प्रणित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान व महाविकास आघाडी तथा घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. तर गांगलवाडी येथील प्रचार सभेत लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान, प्राचार्य जगनाडे, उपेंद्र शेंडे राष्ट्रीय अध्यक्ष खोरीप, प्रदेशाध्यक्ष भाऊ निर्भवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नखाते,काँग्रेस तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, राका तालुकाध्यक्ष सुंदरकर, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, विलास विखार, थाणेश्वर कायरकर, जीवन बागडे, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद झोडगे, मोंटू पिल्लारे, हितेंद्र राऊत, सोनू नाकतोडे, महिला आघाडी अध्यक्ष मंगला लोनबले, योगिता आमले, तथा काँग्रेस पक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी व घटक पक्षाचे सर्व नेते मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शनपर बोलताना लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. किरसान म्हणाले की, भाजप सरकार जनतेच्या पैशातूनच जनतेला प्रलोभन देत यात राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील महिलांना साड्या वाटप करून मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. हे जर महिला सक्षमीकरणाचे पाऊल असेल तर इतर योजना राबवणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या जाहीरनाम्यात पंचसूत्री कार्यक्रमांतर्गत गोरगरीब महिलांना वार्षिक एक लक्ष रुपये, शेतकऱ्यांना हमीभाव, जातनिहाय जनगणना, व देशातील सर्व मागास प्रवर्गांसाठी विविध कल्याणकारी योजना आणण्याचे अभिवचन दिले आहे. आपण सुज्ञ मतदार जर भाजपच्या प्रलोभनांना बळी पडलो तर देशातील महागाई कमी होणार नाही, शेती उत्पादनाला भाव मिळणार नाही, बेरोजगारी संपणार नाही आणि गरिबांचे जगणे अजून अवघड होईल. तुमच्यावर अनाठाई कर लादून त्याच पैशातून तुमचा विकास करू अशी खोटी गॅरंटी मोदीची आहे. अशी टीका करत त्यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.

पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपने सत्ता येतात दिलेल्या खोट्या अच्छे दिनाच्या आश्वासनाला बगल देऊन देशातील जीवनावश्यक वस्तू असलेल्या पेट्रोल ,डिझेल, घरगुती गॅस, शेती उपयोगी अवजारे, यंत्र, रासायनिक खते रासायनिक औषधे यांच्या किमतीत प्रचंड दरवाढ केली. सतत दहा वर्षे खासदार राहून संसदेत आदिवासींचे प्रश्न न मांडणारा खासदार नेते आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 50 दिवसात महागाई संपवतो असे सांगणारे भाजपवाले गेल्या दहा वर्षात महागाई संपवू न शकल्याने तोंडघशी पडले आहेत. देशात आता परिवर्तनाची लाट सुरू आहे. विदर्भातील पाचही जागेवर काँग्रेस जिंकणार असे मत यावेळी विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी व्यक्त केले. इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान हे एक उच्चशिक्षित असून त्यांना प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते जनतेचे प्रश्न संसदेत आक्रमक पद्धतीने मांडतील याकरिता उद्या आणि परवा हे महत्त्वाचे दिवस असून आपण कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता येत्या 19 एप्रिल रोजी आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव कीरसान यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

Previous articleपोंभुर्णा कॉंग्रेस तालुकाध्‍यक्षाचा भाजपात प्रवेश विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र मरपल्‍लीवार
Next article2024 मध्ये मोदींची हवा नाही…भाजप उमेदवार नवनीत राणा यांची कबूली भाजप सत्ता काळात देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी ,शेतमजूर व सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका भाजपने जनतेचे बोट जनतेच्या डोळ्यात घातले – डॉ. किरसाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here