Home चंद्रपूर खळबळजनक :- आमदार जोरगेवार यांचे खाजगी पीए जुन्नावार यांचे वार्षिक उत्पन्न 20...

खळबळजनक :- आमदार जोरगेवार यांचे खाजगी पीए जुन्नावार यांचे वार्षिक उत्पन्न 20 हजार?

अपंग प्रमाणपत्र देणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधिकारी आंबटकर व वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र देणाऱ्या नायब तहसीलदार गादेवार यांच्यावर कारवाई होईल?

चंद्रपूर :-

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे स्विय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले सुबोध जुन्नावार यांना काही दिवसांपूर्वी एका आजाराच्या आधारावर जिल्हा सामान्य रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्यासोबत साठगांठ करून बोगस अपंग प्रमाणपत्र देण्यात आलं व त्या अपंग प्रमाणपत्राच्या आधारे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांच्याकडून केवळ 20 हजार रुपयांचा उत्पन्नाचा दाखला मिळवीला गेला त्यामुळे त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुद्धा त्यांना मिळाला, खरं तर सर्वासामान्य जनतेला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाचे उंभरठे झिजवावे लागतात तरीही त्यांना लाभ लवकर मिळत नाही पण आमदारांच्या पीए ला कुठलेही गंभीर अपंगत्व  नसताना त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे हे अपंगाचे प्रमाणपत्र देतात हा सत्तेचा दुरुपयोग असून संबंधित अधिकाऱ्यांनी आर्थिक लालसेपोटी हा जो प्रकार केला तो अतिशय गंभीर असून त्यांच्यावर निलंबानाची कार्यवाही व्हायला हवी, जर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पीए ला खोटं व बेकायदेशीर प्रमाणपत्र देण्यात आलं तर मग असे कित्तेक प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी वाटले असावे व बोगस लाभार्थी तयार झाले असावे असे स्पष्ट दिसत आहे.महत्वाची बाब म्हणजे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पीए ला महिन्याचा पगार किमान 25 हजार असतांना त्यांना नायब तहसीलदार गादेवार यांनी वर्षीक उत्पन्न 20 हजार रुपयांचं असल्याचं का दाखवलं?

आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व वैद्यकीय अधिकारी डॉ.आंबटकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्यावर दबाव टाकून सुबोध सुनील जुन्नावार या त्यांच्या पीए ला 42 टक्के अपंगत्व असल्याचे खोटे अपंग प्रमाणपत्र (mh1330619930218118) तीन वर्षासाठी 10/1/2024 ला देण्यास भाग पाडले व विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी म्हणून 11/3/2024 ला संजय गांधी निराधार योजनेच्या त्यांना लाभ मिळवून दिला जो निषेधार्थ असून आमदार किशोर जोरगेवार यांनी जनतेला दिलेल्या 200 युनिट वीज बिलाचा मुद्दा सोडवला नाही कुठल्या जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी उपाययोजना केली नाही, केवळ उत्सव महोत्सवाचे आयोजन करून जनतेच्या पैशाची त्यांनी उधळपट्टी केली आहे, त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल रोष असून त्यांचे पीए सुबोध सुनील जुन्नावार यांना त्यांनी ठेकेदारी पण मिळवून दिल्याची माहिती असून या संपूर्ण प्रकरणात अपंग प्रमाणपत्र देणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधिकारी आंबटकर व नायब तहसीलदार गादेवार यांच्यावर निलंबानाची कारवाई कराबी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here