Home चंद्रपूर धक्कादायक :- कमिशनसाठी पाटील यांनी बार मालकाचा प्लॉट केला सासऱ्याच्या नावाने रजिस्ट्री?

धक्कादायक :- कमिशनसाठी पाटील यांनी बार मालकाचा प्लॉट केला सासऱ्याच्या नावाने रजिस्ट्री?

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील यांचे अनेक धक्कादायक कारनामे येणार बाहेर.

चंद्रपूर :-

नवीन बिअर बार, बिअर शॉपी व वाईन शॉपी स्थानानंतरण याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे लाखों रुपयाची लाच मागत होते हे जाहीर होते, मात्र भद्रावती शहरातील एका नवीन बार मालकाने परवानगी मिळविण्यासाठी चक्क आपला (1500 वर्ग फूट) प्लॉट संजय पाटील यांचे सासरे असलेल्या इसमच्या नावे रजिस्ट्री करून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान संजय पाटील यांना न्यायालयातून जामीन मिळाला असला तरी त्यांनी कोट्यावधी रुपयांची माया बेकायदेशीरपणे काम करून मिळवली त्याची एसआयटी चौकशीतून समोर येणार आहेच पण त्यांच्यासोबत कार्य करणारे निरीक्षक, उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्या माध्यमातून बिअर बार, बिअर शॉपी, बाईनं शॉपी व देशी दारू दुकानदार यांच्याकडून हप्ताखोरी होतं असल्याच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होणार असल्याने या सर्वांची सुद्धा एसआयटी चौकशी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.

नवीन बिअर शॉपीचा परवाना साठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे याची तक्रार केली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील, चेतन खारोडे, दुयम निरीक्षक अभय खताळ, तसेच कार्यालय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांचे विरुध्द लाप्रवि द्वारा कार्यवाही करण्यात आली होती. त्यातील चेतन खारोडे, दुयम निरीक्षक अभय खताळ, तसेच कार्यालय अधीक्षक यांना अटक करण्यात आली होती. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षक संजय पाटील हे फरार झाले होते. त्यांनी अग्रिम जमाणतीसाठी कोर्टाचे दार ठोटावले होते, परंतु त्यांना न्यायालयातून जामीन मिळाली नव्हती.

सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी संजयकुमार जयसिंगराव पाटील, अधीक्षक या आरोपीचा शोध घेऊन त्यांना सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या पाचगणी तालुक्यातील भिलार गावातील रिसॉर्टमधून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली व दोन दिवसापूर्वी त्यांना न्यायालयाने जामीन दिला दरम्यान या गुन्ह्यातील अटक झालेल्या दोन आरोपींना अगोदरच न्यायालयाने जमीन दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here