Home चंद्रपूर मनपा आयुक्तांना निवेदन देतास वडगाव प्रभागातील नालेसफाईच्या कामाला वेग माजी नगराध्यक्षा, नगरसेविका...

मनपा आयुक्तांना निवेदन देतास वडगाव प्रभागातील नालेसफाईच्या कामाला वेग माजी नगराध्यक्षा, नगरसेविका सौ सुनीता लोढिया

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  माजी नगराध्यक्षा, नगरसेविका सौ, सुनीता लोढिया यांनी
दि,16,05,2024, ला वडगाव प्रभागातील मागच्या वर्षी जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती ती पूर परिस्थिती यावर्षी सुद्धा निर्माण व्हावी नाही,

म्हणून पावसाळा लागण्याच्या अगोदरच मनपा आयुक्त यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले होते, व त्यांना संपूर्ण प्रभागातील मोठ्या नाल्यापासून तर छोट्या नाल्यापर्यंतची सर्व माहिती लक्षपूर्वक सांगण्यात आले, व मनपा आयुक्तांना पण त्यांच्या या विचारावर गार्बियाने लक्ष घेत,

ताबडतोब मनपा अधिकाऱ्याची बैठक लावून वडगाव प्रभागातील मोठ्या नाल्यापासून तर छोट्या नाल्याची साफसफाई चालू करण्याचे आदेश दिले, व आदेश मिळतात झोन मधील अधिकारी यांनी कामगारांना मोठ्या नाल्यापासून तर छोट्या नाल्यापर्यंत नाल्याची साफसफाई करण्याच्या कामास सुरुवात केलेली आहे,

या कामाचे गार्बियाने लक्ष दिल्यामुळे आता यावर्षी तरी वडगाव प्रभागातील नागरिकांना गेल्या वर्षी जो परिस्थितीच्या त्रास सहन करावा लागला होता तो यावर्षी होणार नाही असे सध्या चित्र दिसून येत आहे, म्हणूनच वडगाव प्रभागातील माजी नगराध्यक्षा, नगरसेविका. सौ, सुनिता लोढिया व वडगाव प्रभागातील नागरिकांनी मनपायुक्ताचे आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here