Home चंद्रपूर सस्पेन्स :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील एसआयटीच्या चौकशीत अडकणार?

सस्पेन्स :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील एसआयटीच्या चौकशीत अडकणार?

मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शब्द, मनसे कडून सुद्धा पाठपुरावा,

जिल्ह्यातील ते बेकायदेशीर बिअर बार, बिअर शॉपी व वाईन शॉपी आणि देशी दारू दुकाने स्थानांतरण परवाने रद्द होणार?

चंद्रपूर :-

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिअर बार, बिअर शॉपी व बाहेरील जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरण वाईन शॉपी व देशी दारू दुकानासाठी मंजुरी देण्याच्या नावाखाली अधीक्षक संजय पाटील यांनी कोट्यावधी रुपयाची अवैध वसुली केल्याप्रकरणी व
एक लाख रुपये बिअर शॉपी च्या परवान्यासाठी घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या नंतर मनसे तर्फे संजय पाटील यांच्या कारभाराची एसआयटी द्वारे चौकशी करून त्यांची चल अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी केली होती, दरम्यान ही मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कडून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती व मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याबाबत निर्णय घेण्याची व चौकशी लावण्याची हमी दिली होती त्यामुळे आता निवडणूकांचा धुरळा संपला असतांना संजय पाटील हे एसआयटी चौकशीत अडकणार असल्याचे संकेत मिळत आहे. आता यात कोण अडकणार याबद्दल सस्पेन्स कायम आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 200 पेक्षा जास्त बिअर बार, बिअर शॉपी व जिल्ह्यात स्थानांतरित वाईन शॉपी व देशी दारू दुकानाना बेकायदेशीरपणे चुकीचे अहवाल बनवून मंजुरी देण्यात आली होती, याबाबत कित्तेक तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयात व जिल्हाधिकारी यंच्याकडे कारण्यात आल्या होत्या पण या सगळ्या बेकायदेशीर मंजुरी करिता अधीक्षक संजय पाटील व त्यांच्या अधीनस्त अधिकारी यांनी लाखों रुपयाची लाच घेतल्याने कुठलीही चौकशी करण्यात आली नाही की कार्यवाही करण्यात आली नाही, दरम्यान संजय पाटील हे आता या प्रकरणात एसआयटीच्या चौकशीत अडकणार असल्याने 200 पेक्षा जास्त परवाने रद्द होण्याची चिन्हे दिसत आहे.

बिअर बार मंजुरी करिता त्या प्लॉट ची विक्री कुणाच्या नावावर?

भद्रावती येथील एका बिअर बारच्या परवान्याकरिता अधीक्षक अंजय पाटील यांनी जी रक्कम मागितली होती त्याची पूर्तता ते बिअर बार संचालक करू शकले नसताना त्यांचा जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचा प्लॉट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्या अधिकारी यांच्या नातेवाईक असलेल्या एका इसमाला रजिस्ट्री करून दिला होता, दरम्यान तो विकत घेणारा इसम कोण व कुणाच्या ईशाऱ्यावर तो विक्री करून घेण्यात आला याची पोल लवकरच खुलणार आहे, पण या प्रकरणात एका राजकीय नेत्यांचा हात असल्याचे बोलल्या जात असल्याने अधीक्षक संजय पाटील यांनी कुणाच्या माध्यमातून परवाने मंजुरी करिता पैसे घेतले या सर्वांचे राज मात्र एसआयटी चौकशीत खुलणार असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान जे बेकायदेशीर परवाने वाटप करण्यात आले त्यां परवाने धारक यांची धाकधुक वाढली असून ज्यांच्या मार्फत अधीक्षक संजय पाटील यांना पैसे देण्यात आले त्यांची पण चौकशी होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here