Home भद्रावती क्राईम :-भद्रावती तालुक्यातील चारगाव नदीपात्रातून वाळूची सर्रासपणे विविध वाहनाद्वारे रेती चोरी.

क्राईम :-भद्रावती तालुक्यातील चारगाव नदीपात्रातून वाळूची सर्रासपणे विविध वाहनाद्वारे रेती चोरी.

 

भद्रावती तालुक्यात दिवसरात्र सुरु असलेल्या रेती चोरी प्रकारणातील ते पार्टनर कोण? कुणाचा आशीर्वाद?

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-

तालुक्यात महसूल प्रशासनाच्या हप्तेखोरी धोरणामुळे वाळू आणि गौण खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणात होतं असून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्या जात आहे दरम्यान आता चारगाव नदीपात्रातून वाळूची सर्रासपणे विविध वाहनाद्वारे रेती चोरी होतं असल्याची खात्रीलायक बाब समोर येत असतांना या रेती चोरीच्या व्यवसायात काही पार्टनर मिळून ते महसूल व पोलीस प्रशासनाला हप्ते देऊन दररोज लाखों रुपयाची रेती चोरीला अंजाम देत असल्याचे बोलल्या जात आहे.

जिल्ह्यात रेती घाटाचा किंव्हा रेती डेपोचा लिलाव झाला नसताना अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी संयुक्तपणे 2022-2023 या वर्षीच्या रेती घाट धाराकांना बेकायदेशीरपणे रेती स्टॉक मधून रेती उचलण्याची परवानगी चालू आर्थिक वर्षात व डिसेंबर 2023 ला दिली होती, आश्चर्यांची बाब म्हणजे कुठल्याही रेती घाट धारकांचा रेती साठा शिल्लक नसताना व ही बाब अप्पर जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना माहीत असतांना विशेष बाब ठरवून सरकारी संपतीची मोठी लूट करण्याची जणू परवानगी रेती घाट धाराकांना दिली असल्याची माहिती सर्वानाचं आहे, पण चलती का नाम गाडी ह्या सरकारी यंत्रणाची ओळख सार्थक ठरवत सरकारी संपतीची लूट सुरु आहे.

चारगाव नदीपात्रातून वाळूची सर्रासपणे विविध वाहनाद्वारे रेती चोरी करण्यासाठी वाळू तस्‍कर मोठमोठी वाळूची वाहने, बोलेरो पिकअप इत्यादी मालवाहतूक वाहनातून दिवसा व रात्री सर्रास अवैद्य रेतीची तस्करी छुप्या मार्गाने भद्रावती शहरात व ग्रामीण भागात करत आहे. दरम्यान रेती चोरी कारण्याऱ्यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला हप्ते देऊन चूप केल्याने बिनधास्थपणे दिवस रात्री शहरात मार्केट मधून भरधाव वेगाने रेती गाड्यांची वाहतूक केल्या जात असल्याने शहरातील जनतेच्या जीवाशी खेळल्या जात असल्याची भावना काही सुजाण नागरिक व्यक्त करत आहे. या रेती चोरी प्रकरणातील जे पार्टनर आहेत त्यांनी पोलीस प्रशासनातील एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून व महसूल प्रशासनातील मोरक्याला हप्ता बांधून खुलेआम रेती चोरी सुरु आहे. आता ते पार्टनर व पोलीस कोण याबाबत लवकरच पोलखोल होणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here