Home चंद्रपूर गंभीर :- डॉ. गावतूरे यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे एका दहा वर्षीय श्रीचा दुर्दैवी...

गंभीर :- डॉ. गावतूरे यांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे एका दहा वर्षीय श्रीचा दुर्दैवी मृत्यू?

शहर पोलीस स्टेशनं येथे डॉ. गावतूरे यांच्या विरोधात तक्रार. नातेवाईकांचा आक्रोश, वार्डात सर्वत्र हळहळ व्यक.

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध डॉ. गावतूरे यांच्या कस्तुरबा रोडवर असलेल्या रुग्णालयात सकाळी जवळपास 8.00 च्या दरम्यान विठ्ठल मंदिर वार्ड येथील एका 10 वर्षीय श्री मुरकुटे या मुलाला साप चावल्याने भरती करण्यात आले होते, दरम्यान मुलाची प्रकृती अस्वस्थ होती व मुलगा तडफडत होता मात्र डॉ गावतूरे यांनी मुलाला बघितले व नर्सेस ला सांगून प्राथमिक उपचार सुरु केला आणि स्वतः पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेल्या त्या तासभर आल्याचं नाही, त्यामुळे मुलाची प्रकृती पुन्हा बिघडली हें लक्षात येताच मग डॉ गावतुरे घाबरले व त्यांनी डॉ. वासाडे यांच्याकडे ऍम्ब्युलन्स बोलावून भरती केले, मात्र वेळ निघून गेली होती आणि त्याचं दरम्यान मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नातेवाईक यांच्या आल्याने डॉ. गावतूरे यांच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुळेच मुलाचा जीव गेला असा आरोप करत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनं येथे डॉ. गावतूरे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान विठ्ठल मंदिर वार्डातील नागरिकांनी डॉ. गावतुरे यांच्या विरोधात संताप व्यक्त केला असून मृतक मुलाप्रती हळहळ व्यक्त केली आहे.

एखादा रुग्ण जेंव्हा रुग्णालयात भरती केल्या जातो तेंव्हा डॉक्टरांनी त्याची योग्य ती विचारपूस करून ट्रीटमेंट करायला हवी, मात्र डॉ. गावतुरे यांनी 10 वर्षीय मुलाची योग्य ती ट्रीटमेंट केली नाही, दरम्यान मुलाच्या वडील व इतर नातेवाईक यांनी डॉक्टरांना विचारले असता चिंता करायची काही गरज नाही योग्य ती ट्रीटमेंट सुरु केली असे सांगितले, त्यामुळे सर्वाना वाटले होते की पेशंट लवकरच बरा होईल, मात्र डॉ. गावतुरे यांना मुलाच्या प्रकृतीचा अंदाज न आल्यामुळं व त्यांनी सर्पदंश यावर कुठंलाही योग्य उपचार सुरु न केल्यामुळं सर्पदंशाने मुलाचा मृत्यू होईल हें नंतर लक्षात आल्याने त्यांनी डॉ. वासाडे यांच्याकडे भरती करण्यात आले, मात्र डॉ. वासाडे यांना मृतक यांच्या नातेवाईकांनी मृत्युंचे कारण विचारले असता तुम्ही डॉ. गावतुरे यांनाचं विचारा असे त्यांनी म्हटले त्यामुळे डॉ. गावतुरे यांच्या चुकीच्या रिटमेंटमुळे एका कोवळ्या दहा वर्षीय मुलाचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

डॉ. गावतुरे यांना मण्यार साप दंश केल्याचे सांगितले असतांना त्या दिशेने उपचार नाही?

खरं तर मण्यार जातीचा साप चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. मण्यार जातीच्या सर्पदंशाचे वैशिष्ट्य म्हणजे कधी कधी हा साप चावला आहे हे देखील आपल्याला कळत नाही. या जातीच्या सापाचे विष नागाच्या विषापेक्षा अनेक पटींनी अधिक जहाल व तीव्र असते. जर व्यक्तीला मण्यार जातीचा सापाने चावा घेतला तर या जातीच्या सापाच्या विषाचा परिणाम मज्जासंस्थेवर पटकन होतो. त्यामुळे व्यक्तीचे मेंदूचे कार्य अनियंत्रित होते व श्वास घ्यायला अडथळे येतात. यामुळे पोटात दुखायला लागते, घसा कोरडा पडतो, जर या जातीच्या सापाने चावा घेतला व लवकर उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होतो हें वैद्यकीय शास्त्रात लिखित असतांना डॉ. गावतुरे यांनी वेळेवर योग्य तो उपचार केला नाही, त्यामुळे मुलाचा जीव गेला त्यामुळे डॉ. गावतुरे यांच्यावर कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी मृतक मुलाचे नातेवाईक व विठ्ठल मंदिर वार्डातील जनतेकडून होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here