Home Breaking News चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची...

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाची कारवाई एकाच दिवशी चोकार

दोन कारवाईत 4 लाचखोरांना अटक

चंद्रपूर  :-  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जूनला कारवाईचा चौकार मारीत, दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 जणांना अटक केली वैद्यकीय अहवाल पाहिजे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारे ९ चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ९ चंद्रपूरचे 58 वर्षीय वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर व वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय दीपक केशव सज्जनवार यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. तक्रारदार हे वणी तालुक्यातील वेडाबाई जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून ते एसटी महामंडळ चंद्रपूर येथे वाहक या पदावर कार्यरत आहे.

वर्ष 2022 मध्ये बंगाली कॅम्प ९ चंद्रपूर येथे तक्रारदार यांचा अपघात झाल्याने त्यांच्या पायात रॉड टाकण्यात आला, काही दिवसानंतर पायातील रॉड चे स्क्रू निघाल्याने त्यांच्या पायात पायजन झाले, त्यावेळी नागपूर येथील एम्स मध्ये त्यांचा उपचार करण्यात आला, या कालावधीत ते रजेवर होते.

उपचार झाल्यावर त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र हवे होते, प्रमाणपत्रासाठी ते जून महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले, तपासणी झाल्यावर त्यांना फिट फॉर लाईट ड्युटी

एकस्पेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करीत वैद्यकीय अहवाल कार्यालयात सादर केला, परंतु वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ९ चंद्रपूर येथील वरिष्ठ सहायक अशोक बाबूरावजी बगुलकर यांना वारंवार भेटून वैद्यकीय अहवाल देण्याबाबत विनंती केली.

परंतु बगुलकर यांनी वैद्यकीय अहवाल देण्यात टाळाटाळ केली, 18 जून रोजी तक्रारदार यांना तुला लगेच वैद्यकीय अहवाल हवा असेल तर 10 हजार रुपये लागतील नाहीतर तुझे काम होणार नाही असे म्हणत बगुलकर यांनी लाच मागितली.मात्र तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ९ चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी आधी तक्रारीची पडताळणी केली. बगुलकर यांनी सदर लाच रक्कम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

19 जून रोजी हॉटेल सेलिब्रेशन, दाताला रोड च्या बाजूला असलेल्या रोमा इलेक्टरीक दुकानासमोर दीपक सज्जनवार याला 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली, त्यावेळी सज्जनवार यांनी बगुलकर यांना पैसे मिळाले असल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले व चमू ने अशोक बगुलकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

सदरकची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, मेघा मोहूर्ले व रवी तायडे यांनी केली.

दुसरी कारवाई

घरकुल चे उर्वरित पैसे खात्यात जमा करण्याकरिता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) याने 20 हजार रुपयांची लाच मागितली, या प्रकरणी तडजोडीअंती 10 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.

27 वर्षीय मिलिंद मधुकर वाढई, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय, चिमूर व 28 वर्षीय आशिष कुशाब पेंदाम, मिस्त्रिकाम यांना अटक करण्यात आली.

तक्रारदार हे मौजा कळमगाव पोस्ट जामगाव, तालुका चिमूर जिल्हा  चंद्रपूर येथील रहिवासी असून ते रोज मजुरीचे काम करतात, तक्रारदार यांच्या नावाने शबरी आवास योजनेच्या वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते.

घरकुल बांधकामकरिता चार टप्प्यात बांधकामासाठी रक्कम जमा होणार होती, त्यांना 2 किस्त 65 हजार रुपये जमा झाले होते, तर तिसरा व चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे रक्कम 45 व 20 हजार असे जमा करून देण्याकरिता अभियंता मिलिंद वाढई तक्रारदाराला 20 हजार रुपयांची लाच मागितली.

अभियंता वाढई यांचे मित्र आशिष पेंदाम यांनी तक्रारदाराला पैसे देण्यास प्रोत्साहित केले, तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधत त्यांना याबाबत तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी केल्यावर 19 जून ला सापळा कारवाई दरम्यान पंचायत समिती कार्यालयात 10 हजार स्वीकारताना अभियंता वाढई यांना रंगेहात अटक करण्यात आली, सोबतच आशिष पेंदाम यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले.

सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व सतीश सिडाम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here