53 लाखांच्या झाडे लावण्याच्या कंत्राटासह इतर कंत्राटाची कामे सुद्धा बोगस असतांना त्यांना काळ्या यादीत कां टाकले जात नाही?
चंद्रपूर :-
सरकारी वीज निर्मिती करणाऱ्या सीएसटीपीएस कंपनीत राजकीय वरदहस्त असलेल्या काही पुढाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे मिळवून बोगस कामे केली व मोठया प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याची अनेक उदाहरणे असून स्वतःला सामाजिक नेता व जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता समजणारा श्रीराम एंजरप्रायजेस चा संचालक तथा भाजप नेता अनिल डोंगरे यांनी 53 लाखांच्या वृक्ष लागवडीच्या कामात एकही झाडं ते वाचवता भ्रष्टाचार करून सीएसटीपीएस प्रशासनाला 53 लाखाचा चुना लावल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व प्रसारमाध्यमातून अनिल डोंगरे यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती, दरम्यान सीएसटीपीएस प्रशासनाने या संदर्भात अनिल डोंगरे यांनी झाडे जगवली नसल्याचा अहवाल तयार केल्यानंतर 95 हजार रुपयांचा दंड थोपटला होता मात्र 53 लाखांच्या कामात केवळ 95 लाख रुपयांचा दंड कुठल्या आधारावर लावला हा संतापजनक प्रश्न भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या माध्यमातून विचारला गेला, मात्र या भ्रष्टाचारात स्थनिक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अभियंता हे सुद्धा यात दोषी असल्याने या कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंता व अनिल डोंगरे यांच्याकडून 53 लाख रुपये वसुल करण्यात यावे व अनिल डोंगरे यांच्या कंत्राटी कंपनी श्रीराम एंटरप्रायजेस ला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत सन 2018-19 मध्ये चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, यांना देण्यात आलेल्या लक्षानुसार एकूण 40,000 वृक्ष लागवड कचराळा अॅश बंड भागात वन विभाग, चंद्रपूर यांनी पुरविलेल्या वृक्षांचे रोपन करण्यात आले. सदर वृक्ष लागवडीच्या देखभालाचे कंत्राट भाजयुमो चे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेसला देण्यात आले होते. यामध्ये वृक्ष लागवड यासह देखभाल करण्याचे पण कंत्राट होते, मात्र सदर ठिकाणी लावलेली झाडे पूर्णतः मेली त्यामुळे झाडांची देखभाल व्यवस्थित न केल्या प्रकरणी सिएसटीपीसए व्यपस्थापनाने श्रीराम एंजरप्रायजेसला 95.436/- रुपयांचा दंड आकारला दरम्यान सीएसटीपीएस व्यवस्थापनावर राजकिय दबाव टाकुन बोगस कामाची बिले उचलणा-या कंत्राटदारावर व कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता परस्पर बिले मंजूर करून शासनाचे नुकसान केल्याप्रकरणी भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल द्वारा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या त्यामुळे हे प्रकरण समोर आलं, मात्र 53 लाखांच्या गैरव्यवहारात केवळ 95 हजार दंड लावणे म्हणजे सीएसटीपीएस व्यवस्थापनाची कुठेतरी अंतर्गत साठगांठ आहे कां ? की अनिल डोंगरे यांना वाचविण्यासाठी हा खेळ सुरु आहे? हे प्रश्न आता उपस्थित होतं असून अनिल डोंगरे यांच्या श्रीराम एंटरप्रायजेस या कंत्राटी कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावे व या प्रकरणात जों अभियंता अनिल डोंगरे यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर निलंबानाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
अनिल डोंगरे यांची अनेक कामे बोगस?
जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाने खपविणारे अनिल डोंगरे यांच्या इचोडा ग्रामपंचायत मधील कामे असो की सीएसटीपीएस मधील कंत्राटी कामे असो सर्वच कामे ही बोगस कामे असून वर्षाकाठी लाखों रुपयाच्या बिलाची उचल करून भ्रष्टाचार करीत आहे. या संदर्भात अधिकची माहिती समोर येणार आहे व कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून किती मालमत्ता कामावली याचा हिशोब बाहेर येणार आहे.