चंद्रपूर शिवसेना पदाधिकारी यांचे मुंबई शिवसेना भवन येथे जोरदार शक्ती प्रदर्शन,
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेण्यासाठी मागितला दोन दिवसाचा वेळ ? काय होणार निर्णय?
मुंबई न्यूज नेटवर्क :-
नुकतेच शिवसेना उबाठा मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रात मोठे फेरबदल करून पक्षप्रमुखांनी दोन जिल्हा प्रमुख असताना उपजिल्हा प्रमुख असलेले रवींद्र शिंदे यांच्या रूपाने तिसरा जिल्हा प्रमुख देऊन विद्यमान जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे व संदीप गिऱ्हे यांचे कार्यक्षेत्र बदलल्याने शिवसेना उबाठामध्ये मोठा असंतोष खदखदत आहे, दरम्यान ज्यांनी पक्ष अडचणीत असताना व पक्षाला कायदेशीर मार्गाने लढाई लढायची होती त्यासाठी पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्याप्रमाणे शपथपत्र द्यायचे होते तेंव्हा पक्षाला मदत न करता हेच लोकं बाहेर होते व यांनी पक्षासाठी मदत केली नाही, त्यावेळी जीवाची बाजी लावून हजारो शिवसैनिकांना आपल्या बाजूने केले होते, मात्र केवळ मुंबई च्या मोठ्या पदाधिकाऱ्यांसोबत हातमिळणी करून पदे आणण्याचे काम रवींद्र शिंदे हें करतं आहे त्यामुळे त्यांना अगोदर जिल्हाप्रमुख पदावरून काढा अन्यथा आमचे सर्व राजीनामे घ्या अशी मागणी जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पक्षप्रमुखांकडे केल्यानी मोठी खळबळ उडाली होती, दरम्यान शिवसेना भवन येथे मुकेश जीवतोडे व संदीप गिऱ्हे यांचे 200 पेक्षा जास्त समर्थक शिवसैनिक व पदाधिकारी यांनी काल पासून गराडा घातला असून काल शिवसेना नेते विनायक राऊत, भाष्कर जाधव इत्यादीची भेट घेऊन आपली कैफियत मांडली होती, मात्र हा निर्णय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, आपण उद्या या मुद्द्याला घेऊन बैठक करू असे शिवसेना नेत्यांनी संगितल्याने आज दिवसभर शिवसेना भवन येथे चंद्रपूर च्या शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन सुरू होते. या शिवसैनिकांची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन निर्णय घेण्याकरिता दोन दिवसाचा वेळ मागितल्याने आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्व शिवसैनिकांच्या नजरा लागलेल्या आहे.दरम्यान रवींद्र शिंदे यांच्या विरोधकांनी मुंबई ला केलेली शक्तिप्रदर्शनची खेळी येणाऱ्या समोरच्या विधानसभा निवडणूकीचे चित्र बदलणारी आहे असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शिवसेना उबाठामध्ये जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्याकडे चंद्रपूर बल्लारपूर व राजुरा हें विधानसभा क्षेत्र होते तर मुकेश जीवतोडे यांच्याकडे वरोरा चिमूर आणि ब्रम्हपुरी हें विधानसभा क्षेत्र होते, दरम्यान मुकेश जीवतोडे यांनी वरोरा विधानसभा निवडणूक लढायची तयारी जोरात चालवली आहे, परंतु उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले रवींद्र शिंदे यांना सुद्धा विधानसभा लढायची आहे त्यामुळे शिंदे विरुद्ध जिवतोडे असा संघर्ष वरोरा विधानसभा क्षेत्रात बघायला मिळत आहे, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समर्थकांना पदे दिल्याने एकाच पक्षात दोन दोन शहर प्रमुख, तालुका प्रमुख व उपजिल्हा प्रमुख असे पदाधिकारी असल्याने शिवसेनेची सूत्र नेमके आहे तरी कुणाकडे? हा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला आहे, आता अशातच जिल्हा प्रमुखांच्या पदाचे वांदे झाल्याने शिवसेनेत आता काही ठेवले नाही, जों आपला पक्ष नीट सांभाळू शकत नाही आणि पक्षात शिस्त नाही तो राज्याच्या राजकारणात काय साध्य करणार? असा शिवसैनिकांमध्ये समज झाल्याने पक्षाचा एक मोठा गट पक्षांपासून दूर जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जातं आहे.
वरोरा विधानसभा क्षेत्रात नेहमीच शिवसेनेत राजकीय वादळ उठत असतें, एकेकाळी डॉ अनिल बुजोने यांच्यासारखा पक्षाला गावागावात पोहचविणारा नेता जेंव्हा आमदार बनणार होता तेंव्हा बाहेरील आलेल्या किशोर डांगे यांना मुंबईच्या काही नेत्यानी उमेदवारी देऊन कट्टर शिवसैनिक असलेल्या डॉ बुजोने यांना डावलले होते, हा इतिहास बघता पुन्हा तीच पद्धत मुंबई स्तरावर होतं असून मुकेश जीवतोडे सारख्या जमिनी स्तरावरच्या कार्यकर्त्याला डावलल्या जातं असतील तर मग शिवसैनिक यांनी करायचे काय? हा प्रश्न घेऊन शिवसैनिक आक्रमक आहे तर दुसरीकडे रवींद्र शिंदे यांनी सहकार क्षेत्रात आपल्या संघटन कौशल्याने तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांना धोबीपच्छाड देऊन बाजार समित्या स्वतःकडे राखल्याने शिवसेनेचे खरे नेतृत्व जाणारं कुणाकडे याची सर्वाना उत्सुकता लागली आहे, दरम्यान पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागितलेल्या दोन दिवसाच्या काळात काय कुठला निकष लावून निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान रवींद्र शिंदे यांनी एवढा मोठा राजकीय भूकंप घडवून आणला त्याचे गुपित काय आहे हें येणाऱ्या दोन दिवसात उघड होणार आहे.