Home चंद्रपूर गौरवास्पद:- यशस्वी उद्योजक दिलीप वावरे यांचा पुण्यात “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मान.

गौरवास्पद:- यशस्वी उद्योजक दिलीप वावरे यांचा पुण्यात “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मान.

प्रबोधन महिला विचार मंच च्या वतीने महाराष्ट्र रत्न दिलीप वावरे यांचा मिळालेल्या सन्मानामुळं सत्कार.

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीत आपले अमूल्य योगदान देऊन गोरगरीब लोकांच्या मदतीला धावून जाणारे, अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सुद्धा आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःचा व्यवसाय उभा करून शेकडो तरुणांना रोजगार देणारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप वावरे यांना राज्यातील पुणे येथे दिला जाणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला, त्यांच्या या सन्मानाबद्दल चंद्रपूर येथील प्रबोधन महिला विचार मंच च्या वतीने महाराष्ट्र रत्न दिलीप वावरे यांचा सत्कार करण्यात आला.

असं म्हटल्या जातं की “ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येयप्राप्ती होते, केवळ पंख असून चालत नाही तर जिद्दीमुळे उडान सफल होते.” दिलीप वावरे यांनी स्वतःचा रोजगार उभा करतं असतांना अनेक संकटाचा सामना करतं ध्येय निश्चित केले आणि आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मिती क्षेत्रात आपल्या ठसा उमटवला, ते केवळ व्यवसायातच गुंतले नाही तर त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा बहुमूल्य योगदान देत अनेकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास पाठबळ दिलं, आज दिलीप रामरावजी वावरे, हें एक यशस्वी उद्योजक, विद्युत कॉन्ट्रॅक्टर व रोजगार निर्माते आणि समाजसेवक म्हणून पुढे आले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना “महाराष्ट्र रत्न” हा बहुमूल्य पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्रमंडळी व चाहत्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here