Home चंद्रपूर खळबळजनक :- चंदावार बिल्डर्स विरोधात स्वप्नवेध ची पोलीस अधीक्षक यंच्याकडे तक्रार?

खळबळजनक :- चंदावार बिल्डर्स विरोधात स्वप्नवेध ची पोलीस अधीक्षक यंच्याकडे तक्रार?

कार्यालय भाडेपत्रात नमूद करारनाम्याचं उल्लंघन, अमानत रक्कम मधील २,८८,०००/- रुपये देण्यास टाळाटाळ?

चंद्रपूर :-

भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर सचिव कृष्णा चंदावार यांचे वडील विजय चंदावार यांनी स्वप्नवेध मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.पुणे ची वित्तीय शाखा चंद्रपूर यांचे अमानत रक्कम मधील २,८८,०००/- रुपये देण्यास टाळाटाळ करून फसवणूक केल्याने संस्थेचे व्यवस्थापक आणि संचालक यांनी याबाबत विजय चंदावार यांचे विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर येथे संस्थेची सुरू कारण्याकरिता विजय चंदावार यांच्या मालकीचे चंदावार बिल्डिंग मधील कार्यालय भाडेपट्टी करारनामा नुसार भाड्याने घेण्यात आलं होतं, दरम्यान दोन महिने कार्यालय सुरू होतं मात्र काही अडचणी आल्याने स्वप्नवेध मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीने कार्यालय खाली कारण्याकरिता रितसर पत्र व तोंडी स्वरूपात चंदावार यांना कळवले व त्यानंतर त्यांनी दोन महिन्यात कार्यालय सुद्धा खाली केले परंतु चंदावार यांनी स्वप्नवेध सोबत केलेल्या कराराचा भंग करून संस्थेची अमानत रक्कम मधील २,८८,०००/- रुपये देण्यास टाळाटाळ सुरू केली व आज सुद्धा ते अमानत रक्कम देण्यास टाळाटाळ करत असून संस्थेची ते फसवणूक करीत असल्याने त्यांचेवर कार्यवाई करण्यात यावी व आमची अमानत रक्कम आम्हांला परत मिळावी याकरिता स्वप्नवेध मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या व्यवस्थापकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

स्वप्नवेध मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे ही वित्तीय संस्था असून ती सेंट्रल रजिस्टर को-ओफ क्रेडिट सोसायटी अंतगर्त MSCCS/CR/७४०/२०१३ ह्या नंबरने रजिस्टर आहे. सदर संस्थेसाठी विजय बाबुराव चांदावार यांच्याकडे संस्थेची शाखा सुरू करण्याकरीता भाडे तत्वावर बाजार वार्डातील चंदावार बिल्डिंग मधील 500 वर्ग फूट जागा असलेला खोल्या (हॉल) घेतल्या होत्या व सदरील करार हा नोटरी द्वारे केलेला होता.

चंदावार यांच्या बिल्डिंग मध्ये संस्थेला व्यवसाय करणे थोडे अडचणीचे वाटत असल्यामुळे त्यांनी घरमालकाला तशी सुचना देऊन कळवले आणि जागा सोडत आहे असे करारा मध्ये ठरलेल्या अट क्रमांक ७ प्रमाणे लेखि व तोंडी पद्ध‌तिणे कळवले, दिनांक ०२/०८/२०२३ला संस्थेने त्यांना ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला कळवले तशे त्यांना पत्र दिले होते. त्यानंतर संस्थेने ३०/०९/२०२३ रोजी सदरील जागेचा ताबा त्यांना दिला आणि च्याव्या पण दिल्या. या करारनाम्यातील करारानुसार चंदावार यांचेकडून २,८८,०००/- रुपये संस्थेला घेणे आहे व त्यांना करार संपुष्टात आणल्यावर चंदावार यांनी देतो असे म्हटले होते, मात्र त्या संदर्भात संस्थेच्या व्यवस्थापक व संचालक यांनी त्यांचा पाठपुराही केला, दरम्यान सदरील जागा सोडल्यानंतर संस्थेने त्या व्यवहाराचा ताळेबंद केला आणि उर्वरित रक्कम चंदावार यांचेकडून मंगितली मात्र आज करतो उद्या करतो महिनाभरात हिशोब करतो असे म्हणून दिलेल्या अमानत रक्कम ३,५०,०००/- पैकी दोन महिन्याचे ऑगस्ट सप्टेंबर महिन्याचे भाडे व वीज बिल वजा जाता २,८८,०००/- रुपये उर्वरित रक्कम चंदावार यांनी संस्थेला दिली नाही, त्यामुळे संस्थेचे संचालक व्यवस्थापक यांनी चंदावार यांचे विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली असून चंदावार यांच्यावर कार्यवाही करून आम्हांला आमचे पैसे परत मिळवून द्यावे अशी विनंती संस्थेचे व्यवस्थापक महेंद्र श्रावण डाखरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. आता या प्रकरणात काय होईल व याआगोदर चंदावार यांनी कुणाला फसवले आहे कां याचा तपास करून पोलीस पुढील कार्यवाही करेल अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here