Home Breaking News 200 युनिट्स आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर निशाणा साधताना प्रवीण पडवेकरच अडकले?

200 युनिट्स आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर निशाणा साधताना प्रवीण पडवेकरच अडकले?

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बनावट ‘क्यूआर कोड’ वापरल्याचे प्रकरण….

चंद्रपूर  :-  चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना दोनशे युनिट देण्याच्या मुद्दयावर, काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर आता या मुद्द्याला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पडवेकर यांनी महापालिकेची परवानगी न घेता शहरात होर्डिंग लावले आणि त्यात बनावट क्यूआर कोडचा वापर केला. या कारणास्तव यंग चंदा ब्रिगेडने महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली असून लवकरच होर्डिंग छापणाऱ्या पडवेकर आणि शिव पार्वती प्रिंटर्सवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.

पडवेकर यांनी २०० युनिटचे आश्वासन जोरगेवार विसरल्याचा आरोप करणारे पोस्टर शहरात लावले होते. परंतु, महापालिकेची आवश्यक परवानगी न घेता हे होर्डिंग लावल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. पडवेकर यांच्यावर बनावट क्यूआर कोड वापरल्याचा आरोपही करण्यात आला असून त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून दोनशे युनिटचे भूत इतक्या लवकर जोरगेवारांवर उतरणार नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून त्याचे काय परिणाम होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकारणातील या नव्या वळणामुळे चंद्रपुरातील वातावरण तापले आहे.

या संदर्भात माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. महापालिकेकडे परवानगी मागितली होती. हे संपूर्ण प्रकरण शिव पार्वती प्रिंटर्सशी संबंधित असल्याचे पडवेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here