अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा
चंद्रपूर :- भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने सोमवार दिनांक 15/7/2024 रोजी दुपारी 4:00 वाजता श्री संत गाडगे बाबा मुकबधीर विद्यालय, पिपळा फाटा, हुडकेश्वर रोड, नागपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री संगम लालजी गुप्ता प्रतापगढ व अध्यक्षस्थानी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री.संजय गाटे हे उपस्थित होते.
या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष श्री.देवराव सोनटक्के, संपर्कप्रमुख श्री.रवींद्र चौहान, श्री.रवींद्र येनूरकर, श्री.प्रकाश बागमारे, श्रीमती. अर्चना डेहनकर, व इतर मान्यवरांसह डॉ.अशोक जिवतोडे, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र.
बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आणि भविष्यात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात राबविण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी ही बैठक एक महत्त्वाची घटना होती आणि याने समाजाच्या चिंता आणि आकांक्षा सोडवण्याच्या भाजपच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात आला.