Home चंद्रपूर मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी मनपाने विकसित केले पोर्टल ऑनलाईन करता येणार नोंदणी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी मनपाने विकसित केले पोर्टल ऑनलाईन करता येणार नोंदणी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर   :-  ०१ ऑगस्ट – मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी चंद्रपूर मनपाद्वारे vayoshree.cmcchandrapur.com ही सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यात आली असुन ६५ वर्षावरील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. बुधवार ३१ जुलै रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात झालेल्या बैठकीत सदर सॉफ्टवेअर प्रणालीचे सादरीकरण करून उपस्थीत सर्वांना अर्ज कसा करावा याची माहिती देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांना सहजतेने हाताळता येईल असे हे पोर्टल तयार करण्यात आले असुन यात नोंदणी करतांना आधारकार्ड क्रमांक टाकुन आपला पासवर्ड तयार करावा लागतो. पासवर्ड महत्वाचा असल्याने तो जपुन ठेवणे आवश्यक आहे. या पोर्टलवर आवश्यक असे काही प्रमाणपत्र उपलब्ध असुन ते डाऊनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी लागते. त्यानंतर प्रत्यक्षरीत्या भरून ती प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक असते.

समाज कल्याण कार्यालय तसेच चंद्रपूर मनपाच्या ३६ केंद्रांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे सुरु असुन याच केंद्रांवर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचाही अर्ज भरता येणार आहे. जे नागरिक श्रावण बाळ योजनेस पात्र आहेत ते या योजनेस सुद्धा पात्र असणार आहेत.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येणार आहे. ६५ वर्षावरील सर्व नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यास नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
याप्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे,समाज कल्याण विभागाच्या विशेष अधिकारी प्रतिभा भागवतकर, राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक उपस्थीत होते.

अर्ज कसा करावाः- अर्जदारांनी योजनेच्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज शासन निर्णयात नमूद अटीनुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय येथे व लवकरच मनपा केंद्रातसुद्धा सादर करता येणार आहे.

संपर्क करा : फॉर्म भरतांना काही अडचण असल्यास ९३०७४०९९३८ या समाज कल्याण विभागाच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पात्रतेचे निकष :

१. राज्यातील ज्येष्ठ नागरिक दि. ३१.१२.२०२३ अखेर पर्यंत वयाची ६५ वर्ष पूर्ण केली असावी.
२. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य/ केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजने अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन पुरावा सादर करु शकतो.
३. उत्पन्न मर्यादा रु. २,००,०००/- आत
४. सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात शासनाद्वारे कोणतेही लाभ न घेतल्याचे घोषणा पत्र
५. लाभार्थ्यांच्या खात्यात ३,०००/- थेट लाभ झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विहित केलेली उपकरण खरेदी करण्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
६. निवड/निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येकी ३० टक्के महिला राहतील.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्र :

१. आधार कार्ड/मतदान कार्ड
२. राष्ट्रीय बँकेची पासबुक झेराक्स
३. पासपोर्ट आकाराचे २ फोटो
४. उपकरण/साहित्याचे (दुबार लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र )
५. उत्पनाचे स्वयंघोषणा पत्र
६. राशनकार्ड (पिवळी / केशरी)
७. जन्मतारखेचा पुरावा
८. ज्या साहित्याची आवश्यकता आहे त्यासाठी शासकीय किंवा मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विहित नमुन्यात प्रमाणपत्र लाभार्थ्यांना घ्यावे लागणार आहे.

कोणते साहित्य खरेदी करता येणार ?
१. चष्मा
२. श्रवणयंत्र
३. ट्रायपॉड
४. स्टिक
५. व्हील चेअर
६. फोल्डिंग वॉकर
७. कमोड खुर्ची
८. नि-ब्रेस
९. लंबर बेल्ट
१०. सर्व्हायकल कॉलर, याव्यतिरिक्त इतर साहीत्य हवे असल्यास खरेदी करता येईल.

अर्ज कुठे करावा ?

१. मनपा मुख्य कार्यालय – ३ केंद्रे
२. संजय गांधी मार्केट झोन १ कार्यालय – २ केंद्रे
३. सात मजली इमारत झोन कार्यालय क्र – २ केंद्रे
४. बंगाली कॅम्प झोन कार्यालय क्र – २ केंद्रे
५. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय – ४ केंद्रे

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे –

१. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,रामनगर
२. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,दे. गो. तुकूम
३. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र,इंदिरानगर
४. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोपालपुरी, बालाजी वार्ड
५. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, बगडखिडकी
६. शहरी प्राथ. आरोग्य केंद्र, नेताजी चौक, बाबुपेठ
७. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सुपर मार्केट, भिवापूर

आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रे –

१. प्रज्ञा चौक, स्वावलंबी नगर, नगिनाबाग, चंद्रपूर
२. वसंत नगर, दे. गो. तुकूम, चंद्रपूर
३. विवेकानंदन नगर, वडगाव वार्ड, चंद्रपूर
४. रवींद्रनाथ टागोर प्राथ. शाळा, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर
५. रयतवारी कॉलरी, वार्ड नं, १९, चंद्रपूर
६. रहमत नगर, के.जी.एन. मस्जिद, चंद्रपूर
७. ताडबन, अंचलेश्वर वार्ड, नं.२, रविदास चौक, चंद्रपूर
८. झाकीर हुसेन प्रायमरी शाळा, दादमहाल वार्ड, चंद्रपूर
९. आपला दवाखाना, घुटकाळा वार्ड, चंद्रपूर
१०. लालपेठ कॉलरी नं, ३, श्रीनगर चंद्रपूर
११. गौरी तलाव बाबुपेठ, चंद्रपूर
१२. हिंग्लाज भवानी वार्ड नं. १७, साईबाबा मंदिर जवळ, चंद्रपूर
१३. महाकाली कॉलरी, प्रकाश नगर, चंद्रपूर
१४. पंचशील चौक-१, कॉलरी रोड, चंद्रपूर
१५. इंदिरा नगर, पंचशील चौक, मूल रोड, चंद्रपूर
१६. शास्त्रकार ले आऊट, रयतवारी कॉलरी
#mukhyamantrivayoshriyojna #CMC #CCMC #chandrapur #cmccommissioner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here