Home चंद्रपूर

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण

शिवानी वडेट्टीवार यांची उपस्थीती- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत साधला संवाद

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-अविरत मानव सेवेकरिता सदैव तत्पर असलेले व सच्चा जनसेवक म्हणून सर्वदूर परिचित, राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातून ब्रह्मपुरी तालुक्यात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच नोटबुकचे वितरण करण्यात आले.

एकीकडे देशात साक्षरतेसाठी सर्व शिक्षा अभियानाचा सरकार डंका पिटत आहे. मात्र दुसरीकडे प्रचंड महागाई व बेरोजगारीमुळे अनेकांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तर शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शासनाने शालेय गणवेश, व मोफत पाठ्यपुस्तके योजना कार्यान्वित केली. परंतु बाजारपेठेत उपलब्ध असलेले नोटबुक यांची वाढलेली किंमत लक्षात घेता गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. तर राजकारणात समवेतच विविध सामाजिक उपक्रमातून सामाजिक दायित्व जोपासणारे व सच्चा जनसेवक अशी ख्याती प्राप्त, राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ग्रामीण स्तरावरील गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता मदतीचा हात पुढे करीत सामाजिक उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुके उपलब्ध करून दिली. सदर नोटबुकांचे वितरण ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी, बेटाळा, गांगलवाडी, तळोधी, मेंडकी, उदापुर, पारडगाव, किन्ही, रूई, निलज, पाचगाव, बरडकिन्ही, चिचगाव, वांद्रा, आवळगाव व इतरही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवानी वडेट्टीवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्या स्मिता पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, बाजार समितीच्या उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका वनिता अलगदेवे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष मुन्ना रामटेके, माजी सरपंच राजेश पारधी, कृउबा संचालक किशोर राऊत, युवक काँग्रेसचे रुपेश बानबले, माजी जि.प. सदस्या भावना ईरपाते, कल्पना तुपट, अण्णाजी ठाकरे, उत्तम बनकर, कृउबा माजी संचालक सुरेश दर्वे, सरपंच मंगला ईरपाते, सरपंच मंजुषा ठाकरे, सरपंच दौलत ढोंगे, कृउबा संचालक ब्रम्हदेव दिघोरे, उपसरपंच विनोद घोरमोडे, सरपंच प्रितम बामनवाडे, विजय नाकतोडे, देवचंद ठाकरे, उपसरपंच शंकर कोपुलवार, उपसरपंच गुरुदेव वाघरे, सरपंच मुकुंदा शिवुरकार, गणेश घोरमोडे, सरपंच धीरज धोंगडे, ज्ञानेश्वर ठाकरे, पुंडलिक प्रधान, नरेश निकोडे, तथा सर्व ग्राम कांग्रेस कमिटीअध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते, व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here