Home भद्रावती संतापजनक :- राजकीय टक्केवारीत उखडले वरोरा भद्रावती तालुक्यातील रस्ते.

संतापजनक :- राजकीय टक्केवारीत उखडले वरोरा भद्रावती तालुक्यातील रस्ते.

स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेला मरण यातना देणाऱ्या त्या टक्केखोरांचं पितळ उघड पडेल का? एक प्रश्न.

वरोरा / भद्रावती :-

वरोरा भद्रावती क्षेत्रातील गावागावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा बघितली की एवढा संताप येतो की हे कोण ठेकेदार आहेत ज्यांनी हा रास्ता बनवला आहे व ते कोण लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या आशीर्वादाने ह्या ठेकेदारांनी हे बोगस रस्ते बनवले आहे, पण याबाबत जनतेच्या मनात केवळ चीड आणि संताप आहे पण ते व्यक्त करण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही आणि म्हणूनच बिनभोबाटपणे अतिशय निर्लज्ज पद्धतीने या रस्त्याची देखरेख करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते व पंचायत समितीचे बांधकाम अभियंते आपल्या टक्केवारीत मशगुल आहे, स्थानिक अनेक लोकप्रतिनिधी तर केवळ आपल्या पोसलेल्या त्या ठेकेदारांना कामाची क्वालिटी काय आहे हे विचारत नाही तर टक्के विचारतात आणि त्या टक्कासाठी जनतेच्या वाट्याला निकृष्ट दर्जाचे रस्ते येतात आणि मग त्या खड्डे पडलेल्या रस्त्याने अपघाताचे भूत घेऊन मार्गक्रमण करावे लागताहेत हे येथील जनतेचं दुर्भाग्यचं म्हणावं लागेल.

खरं तर जे लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांच्या जाहिरानाम्यात नेहमीच एक गोस्ट नमूद असतें की निवडून आल्यास आम्ही चांगले रस्ते देऊ पण ते निवडून आल्यानंतर कळतं की तो जाहिरानामा एक दिखावा होता तो एक राजकीय जुमला होता, मुळात त्याचं रस्ते बांधकामात टक्के घेऊन तो रस्ता कसा निकृष्ट दर्जाचा होईल व त्याच्या डागडुजी करिता पुन्हा बजेट करून कसं लुटता येईल याच्या कहाण्या लोकप्रतिनिधी लिहीत असतात असाच प्रकार सर्वत्र दिसत आहे, ही बाब केवळ वरोरा भद्रावती मधीलचं आहे असे नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने जनतेच्या पैशाची ही लूट करून त्यांना वेठीस धरण्याचे कारस्थान चालवलेले आहे. आता ही सगळी विदारक परिस्थिती बदलायची असेल तर सर्व जनतेनी एकत्र येऊन लढा उभारणं आवश्यक आहे, हा काही राजकीय स्टंट करण्याचा विषय नाही तर खऱ्या अर्थाने जनतेच्या पैशाची चालवलेली लूट आणि राजकीय टक्केवारीत जनतेला मरण यातना भोगाव्या लागताहेत त्यावर चिंतन करणारी बाब आहे.

कुठे कुठे रस्ते उखडले?

वरोरा चिमूर महामार्ग टक्केवारीत बर्बाद झाला आणि त्यातून शेकडो लोकांना दुखापत झाली तर काहींचे अपघातात निधन झाले हे सर्वाना माहीत आहे, दरम्यान वरोरा माढेळी रस्त्यांची डागडुजी झाली पण त्यात सुद्धा मोठंमोठे खड्डे पडले, माढेळी नागरी व्हाया महाडोळी आणि व्हाया केळी मार्गात खड्डेचं खड्डे आहेत तर मांगली तुमगावं तिकडे टेमुर्डा बेलगाव चिकणी, इकडे आशी डोंगरगाव चिकणी तिकडे टेमुर्डा ते शेगाव मार्ग, साखरा, वडगाव रस्त्यावर मोठे खड्डे आहेत, वरोरा शहरात तर रस्ते विकासाचा पार बट्याबोळ झाला त्यातच आलिशान ते बावणे लेआऊट व अंतर्गत रस्त्याची वाट लागली आहे, भद्रावती तालुक्यातील रस्त्यांची पण अशीच अनेक गावागावात जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागली असून राजकीय टक्केवारीत जनतेच्या पैशाची राखरांगोळी झाली पण संताप व्यक्त करायचा कसा आणि कुणाकडे करायचा याचा शोध मात्र लागता लागत नाही आता या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महिला संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती असून लवकरच या रस्त्यांचे पंचनामे होतील अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here