Home लक्षवेधी जनतेच्या_सेवेत _सदैव _तत्पर डॉ, विश्वास झाडे…

जनतेच्या_सेवेत _सदैव _तत्पर डॉ, विश्वास झाडे…

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

बल्लारपूर विधानसभा आरोग्य सेवा आपल्या दारी तपासणी व मोफत औषध प्रचार सेवा व आरोग्य बद्दल जनजागृती

चंद्रपूर  :-  जीवन ज्योती प्रतिष्ठान चंद्रपूर तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत आरोग्य सेवा आपल्या दारी या संकल्पनेतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापूर व ऊर्जा नगर ग्रामपंचायत येथे डॉ. विश्वास झाडे (उमेदवार 72 बल्लारपूर विधानसभा 2019) तज्ञ डॉक्टरांसोबत नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी व मोफत औषध प्रचार सेवा व आरोग्य बद्दल जनजागृती..

मागील अनेक वर्षापासून आपल्या व्यस्त वैद्यकीय व्यवसायातून समाज हिताच्या व जनसेवेचा ध्यास घेऊन अनेकांच्या जन समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम डॉ. विश्वास झाडे यांनी केलेले आहे, डॉ. विश्वास झाडे यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापुर वार्ड व ऊर्जा नगर ग्रामपंचायत भागातील लोकांच्या घरोघरी जाऊन तब्येतीची तपासणी केली, व त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्या कशा प्रकारे सोडवल्या जातील यासाठी प्रयत्न करतात.शिक्षणातून प्रगती व्हावी असे प्रत्येकांना वाटते पण प्रयत्न शिवाय व जनजागृती शिवाय ते शक्य नाही असे डॉ. विश्वास झाडे यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी आरोग्यसेवा आपल्या द्वारी या उपक्रमाची सुरुवात करून जनतेच्या घरी जाऊन आरोग्य सेवा दिली.

सध्या पावसाचे दिवस सुरू आहे, पूर आल्यानंतर आठ ते दहा दिवसात त्या भागात महामारी पसरते, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापुर व उर्जानगर या भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरी पाणी घुसले होते त्यानंतर तिथे रोगराई महामारी पसरण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात घेता जीवन ज्योती प्रतिष्ठान चे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते डॉ. विश्वास झाडे (उमेदवार 72 बल्लारपूर विधानसभा 2019) यांनी आपल्या चमू सोबत तिथे प्रत्यक्षात भेट दिली.

सर्वांच्या तब्येतीची तपासणी केली व तात्काळ तिथे औषधी उपलब्ध करून दिले. दुर्गापुर व ऊर्जा नगर या भागातील 600 ते 700 लोकांना घरपोच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्यासोबत डॉ. राहुल मोगरे(बालरोग तज्ञ),डॉ. अमित कोसुरकर( सामान्य चिकित्सक), लिखित खोंडाकर, हेमंत बालपांडे, आदिनाथ कोठारे, भूपेश काटेखाये, सतीश गुहे ,अमर रामटेके व व गावातील समाज सेविका श्रीमती अनिताताई माऊलीकर, एड.रवी धवन, उपसरपंच प्रज्योत पुणेकर, सारंग वाकोडे, मुसाभाई शेख, शार्दुल गणवीर, दीपक कुंडोजवार, नामू शेंडे, मुन्ना आवळे,नसरुद्दीन शाह, किशोर वाल्दे,अर्जित राऊत, राजू रायपुरे, अर्चना राऊत या सेवेत सहकार्य केले व गावांतील बरेच नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here