Home चंद्रपूर बोथली केंद्राअंतर्गत जि.प.शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ...

बोथली केंद्राअंतर्गत जि.प.शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सामाजिक उपक्रम

बोथली केंद्राअंतर्गत जि.प.शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांचा सामाजिक उपक्रम

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

सावली :- राज्याचे विरोधी पक्षनेते व ब्रम्हपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सामाजिक उपक्रमातुन तालुक्यातील बोथली केंद्रातील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप आज करण्यात आले. यावेळी हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीतीताई गोहने यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधून त्यांचे स्वप्न आणि भविष्यातील योजनांबद्दल जाणून घेतले.

विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधल्यास वर्गात व्यस्त राहण्याची आणि शिकण्याची आवड त्यांच्यात निर्माण होते.संवाद करताना विद्यार्थ्यांनी त्यांचा आवडता खेळाडू, पदार्थ, स्वातंत्र्य सैनिक, संशोधक, समाजसेवक, छंद याबद्दल माहिती मिळाली.

नोटबूक वितरण करते वेळी चकपिरंजी येथील सरपंच सौ.उषाताई गेडाम,चारगाव येथील सरपंच सौ.ज्योती बहिरवार, हिरापूर येथील उपसरपंच मा.शरद कन्नाके,बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार,चकपिरंजीचे उपसरपंच मा.अरविंद भैसारे,जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ता मा.उमाजी दंडिकवार,मा.शामरावजी बाबनवाडे, ग्राम पंचायत सदस्य हिरापूर सौ.निता मुनघाटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिरापूर मा.संदीप सायत्रावार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here