राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हप्तेखोरीत दारूचा अवैध व्यवसाय फोफावला, संजय पाटीलचा वारसा चालविणारे ते अधिकारी कोण?
चंद्रपूर :-
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट नितिमुळे व महिन्याची कोटीच्या घरात वसुली मुळे अगोदरच रडारवर आलेले अधीक्षक संजय पाटील व कार्यालयीन अधीक्षक आणि निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या नंतर या कार्यालयातील अधिकारी अवैध वसुली बंद करतील अशी शक्यता बळावली होती मात्र आता त्याहीपेक्षा जास्त वसुली सुरु असल्याची परिस्थिती दिसत आहे. दरम्यान वाईन शॉपी मधून दररोज लाखों रुपयाची देशी विदेशी दारू गावागावात पोहचवून कोट्यावधीची उलाढाल होत असल्याचा खेदजनक प्रकार चंद्रपूर सह वरोरा भद्रावती येथे सुरु आहे. दरम्यान तुकूम येथील चिंटू सरदार यांच्या वाईन शॉपीतुन गाड्या भरून त्या पार्सल होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तुकूम येथील चिंटू सरदार यांच्या वाईन शॉपी मधून दुपारी आणि सायंकाळी कार क्रमांक MH34AM-400 या गाडीच्या डिक्कीत देशी विदेशी दारूचा माल भरून ती गाडी गावखेड्यावर पोहचविल्या जातं आहे दरम्यान आज दिनांक 6 ऑगस्ट ला तीन वेळा हा माल भरून पोहचवीला असल्याची व्हिडीओ फोटोसह माहिती असून या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभाग नेमकी काय भूमिका घेतय आणि हरवेळी वाईन शॉपी मालकाला वाचवेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काय व्हायला पाहिजे कार्यवाही?
नियमानुसार कुठल्याही वाईन शॉपी धारकाला आपल्या दुकानाव्यतिरिक्त कुठेही दारू पुरवठा करता येत नाही आणि ती पुरवठा केलेली दारू जर पोलिसांनी पकडली तर ती दारू जिथून आणल्या गेली त्या दुकानंदारावर कारवाई होते व बेकायदेशीर दारू विक्री केल्याच्या करणावरून त्या वाईन शॉपी किंव्हा देशी दारू दुकानाचा परवाना रद्द होऊ शकतो, या अगोदर याचं चिंटू सरदार यांची दारू पकडल्या गेली होती पण मुळात वाईन शॉपी मालकावर कार्यवाही व्हायला हवी ती झाली नाही त्यामुळं राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांची भीती राहिली नसल्याने बेधडक दिवसाढवळ्या वाईन शॉपी मधून दारूची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याने त्या वाईन शॉपीला बंद करण्याची मागणी होत आहे.
वरोरा बोर्डा चौकातील देशी दारू दुकानातून अवैध पुरवठा?
वरोरा येथील बोर्डा चौकात असणारी देशी दारू दुकान ही पोलिसांच्या रडारवर असून सुद्धा अंजु अन्ना या देशी दारू दुकानातून खांबाडा व त्यानंतर समुद्रपूर हिंगणघाट तालुक्यात दारूचा पुरवठा करीत असल्याची माहिती आहे, शिवाय अंजु अन्ना याच्या बेकायदेशीर असलेल्या बिअर बार जवळ देशी दारू विक्री होत असल्याची माहिती असून ती दारू ज्या कारने पुरवठा होते त्या कार चा क्रमांक सुद्धा माहीत असून अंजु अन्ना यांची खांबाडा येथे दारू पकडली होती पण त्यात त्याला सुद्धा सोडण्यात आले होते.