Home चंद्रपूर खळबळजनक :- सीएसटीपीएस मध्ये स्थापत्य अभियंत्याच्या प्रतिनियुक्ती मध्ये घोळ.

खळबळजनक :- सीएसटीपीएस मध्ये स्थापत्य अभियंत्याच्या प्रतिनियुक्ती मध्ये घोळ.

प्रतिनियुक्ती करिता देण्यात येणारी रक्कम मधातच अधीक्षक अभियंता यांच्या घशात? वरिष्ठ अनभिज्ञ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

आशिया खंडात सर्वात मोठया वीज निर्मिती केंद्रापैकी एक असलेले चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्र नेहमीच वादाच्या भोंवऱ्यात घिरट्या घालत असतं, यामध्ये कधी कोळसा पुरवठा घोटाळा, कोळसा चोरी घोटाळा, भंगार घोटाळा, कधी पाईप चोरी घोटाळा, कधी बोगस कर्मचारी भरती घोटाळा तर कधी अधिकारी कर्मचारो यांच्या बदल्या आणि बढतीत घोटाळा होत असतो आणि दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होऊन वीज निर्मिती करिता अतिरिक्त बोझा पडत असल्याने वीज उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने मग वीज युनिट चे दर वाढविण्याची नामुस्की सरकारवर येत असतें असाच एक प्रतिनियुक्तीचा एक घोटाळा समोर आला असून सुरुवातीपासून एकाच सेक्शन मध्ये काम करणारे स्थापत्य अभियंते यांना कित्तेक वर्ष एकाच ठिकाणी काम केल्यानांतर त्यांची बदली करण्यापेक्षा त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना त्याचं सेक्शन मध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आल्याने कर्मचारी अधिकारी यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सीएसटीपीएस मधील स्थापत्ये अभियंते यांची प्रतिनियुक्ती देतांना म्हटले आहे की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित कर्मचारी सेवाविनियमातील सोळाव्या अनुसूचीद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांस अनुसरुन सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या मंजुरीनुसार निम्नलिखित स्थापत्य अभियंते यांची स्तंभ क्रमांक ४ मध्ये दर्शविलेल्या ठिकाणी समपदावर प्रतिनियुक्तीच्या कालावधीमध्ये ६ महिन्यांची मुदतवाढ (दिनांक. ०३.०२.२०२५ पर्यंत) देण्यात येत आहे. यामध्ये श्रीमती प्राजक्ता पुंडलिकराव स्वामी, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) स्थापत्य-२, कोराडीमधून म.ओ. वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतिनियुक्ती, अश्विनी गोपाळराव नंदेश्वर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य) स्थापत्य-२, कोराडी मधून म.ओ.वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतियुक्ती ऋषीकेश सुभाषराव पुंडकर, उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म.ओ.वि. केंद्र, चंद्रपुर स्थापत्य बांधकाम मंडल, पारस येथे तर स्वप्निल शेषराव ठाकरे, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) स्थापत्य बांधकाम मंडल, चंद्रपुर म.औ.वि. केंद्र, चंद्रपुर येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.

दरम्यान स्थापत्य अभियंते यांच्या ज्या प्रतिनियुक्त्या देण्यात आल्या यासाठी एका अधीक्षक अभियंता यांच्यामार्फत एक रक्कम वरिष्ठाना देण्यासाठी घेण्यात आली मात्र ही रक्कम वरिष्ठाकडे पोहचली नसल्याची माहिती असून या संदर्भात एका स्थापत्य अभियांत्याचे स्टेटमेंट समोर येत आहे, आता या प्रकरणी काय उहापोह होणार आणि यात दोषी कोण हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here