अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर घुगुस-पडोली-ताडाली मार्गावर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामुळे प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे प्रफुल पचकाटे यांचे मोटरसायकल अपघातात निधन झाले आहे. तसेच, पडोली सिग्नल जवळील एका खड्ड्यामुळे पूजा हलदर या मुलीचा अपघात होऊन ती सध्या दवाखान्यात भरती आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या मागणीसाठी भाजपा नेते ब्रिजभूषण पाझारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभे साहेब यांना भेट घेऊन सदर माहिती सांगितली आहे व पडोली ठाणेदार यांना रिपोर्ट दिला आहे आणि खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
ब्रिजभूषण पाझारे यांनी स्पष्ट केले की, “रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कारवाई करावी आणि खड्डे बुजवावेत. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
यासोबतच, पाझारे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की, “मी स्वतः या रस्त्याची पाहणी केली असून पडोली ठाणेदारांना रिपोर्ट सादर केला आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई केली नाही, तर आम्ही जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करणार आहोत.”
भारतीय जनता पार्टीचे नामदेवजी डाहुले, विनोद खडसे, शोभाताई विदुरकर, अजय चालेकर, मीनाताई माणूसमारे, धनराज कोवे, ओम पवार, दुर्गाताई बावणे, रजनीताई ढुमणे, रमाकांत बल्की हे देखील या मागणीला पाठिंबा देत आहेत.