मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताच लातूर जिल्ह्यातील नरवटवाडी व पानगाव येथील ग्रामस्थानी केला जल्लोष.
न्यूज नेटवर्क :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आले असतांना त्यांनी लातूर ग्रामीणमधून मनसेचे सरचिटणीस तथा शेतकरी सेना प्रांताध्यक्ष संतोष नागरगोजे यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील मनसेचे ते पहिले उमेदवार ठरले आहेत. धाराशिवचा दौरा संपल्यानंतर राजसाहेब ठाकरे लातूर दौऱ्यावर आले होते त्या दरम्यान पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत राजसाहेब ठाकरे यांनी संतोष नागरगोजे यांची लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या या उमेदवारीने त्यांच्या जन्मभूमी असलेल्या नरवटवाडी व पानगाव येथील ग्रामस्थांनी एकच जल्लोष करत आंनद व्यक्त केला व नागरगोजे त्यांचे स्वागत करून यावेळी गुलाल आपणच उधळणार असा संकल्प केला.
शेतकऱ्यांना पीक पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रसार, कीड व रोगांपासून पिकांचे संरक्षण, बाजारातील कल, बाजारातील विविध पिकांच्या किंमती, जनावरांच्या आरोग्यासाठी निदान सेवा इत्यादींविषयी तज्ञ सेवा व सल्ला देण्यासाठी शिवाय माती परीक्षण करून जमिनीची पत सुधारण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून प्रयोगशाळा नव्हे तर एक प्रकारे शेतीचा दवाखाना अर्थात कृषी चिकित्सालय प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात उभारून शेतीला आधुनिक पद्धतीने प्रगत करण्याचा व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्महत्यापासून वाचविण्याचा संकल्प करणारे शेतकरी नेते संतोष नागरगोजे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रेरणास्रोत ठरले आहे, त्यांच्या या शेतीच्या नव्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा आधुनिक पद्धतीने केला जाणारं असल्याने शेती व्यवसायला उद्योगाचे स्वरूप येणार असल्याचे त्यांचे मत आहे.
विदर्भ मराठवाडा येथील शेतकरी योग्य मार्गदर्शनाअभावी सरासरी उत्पन्न घेण्यात मागे पडत आहे, कारण योग्य ते रासायनिक खते, सेंद्रिय खते, रासायनिक औषधांचा वापर कसा करावा यासाठी मार्गदर्शन मिळत नाही शिवाय रासायनिक खते व सेंद्रिय खत वापरताना माती व पाणी परीक्षण शेतकरी करत नाही पर्यायाने शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन मिळत नसल्याने व जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड, खत व्यवस्थापन याबद्दल माहिती नसल्याने परंपरागत शेतीच्या पद्धतीनेच शेतकरी पीक घेतात त्यामुळे उत्पन्नात वाढ होतं नाही व एकरी उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे, त्यामुळे आता आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी माती व पाणी परीक्षण सोबतच खतांच्या औषधीचे व्यवस्थापन कसे करावे यासाठी शेतकऱ्यांचा दवाखाना सुरू करणे आवश्यक असल्याने तो दवाखाना विदर्भ मराठवाडा येथील जिल्ह्यात सुरू करू व शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे तंत्रज्ञान देऊन उत्पन्नात वाढ करू आणि शेतकरी समृद्ध करू असा शेतकरी नेते संतोष नागरगोजे यांनी संकल्प केला आहे
जिल्ह्यात तालुका स्थरावर शेतकरी कृषी प्रदर्शनी भरविणार.
राज्यात विदर्भ आणि मराठवाडा या दोन भागात नेहमी शेतकरी आत्महत्या करताय त्यामागची कारणे शोधताना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पहिली शेतकरी आत्महत्या तब्बल ३५ वर्षांपूर्वी झाली होती त्याचा विचार करावा लागेल, १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी सहकुटुंब आत्महत्या केली होती आज यवतमाळ जिल्ह्यात वर्षेगणित आत्महत्या वाढत आहे, कारण आजही शेतकरी शेतीच व्यवस्थापन समजून घेत नाही कारण त्यांना तसं कुठलं तज्ञाकडून मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून यापुढे दिले जाणारं असून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना कृषी प्रदर्शनीचे आयोजन करून तज्ञाकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा कसा मिळेल?
सरकारतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक भागात व गावात पर्जन्यमान मापक यंत्र बसवणे अभिप्रेत आहे, मात्र विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी ते दिसतं नाही कारण जिथे पर्जन्यमान मापक यंत्र बसवले जाते त्यावरून पीक विम्याची रक्कम किती मिळणार हे अवलंबुन आहे, त्यामुळे पर्जन्यमान मापक यंत्र बसवून व मापानी प्रयोग करून अग्रीम विमा शेतकऱ्यांना मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्जन्यमान मापक यंत्र बसवले कां याचा शोध घ्यावा व न बसाविल्यास त्याची तक्रार तहसीलदार कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी तेंव्हाच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा होईल असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
शेतीच्या आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना देणारं.
शेतकरी शेती करतांना ती आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन करत नाही पर्यायाने शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबुन असतो, त्यामुळे उत्पन्न कमी होतं आणि शेतकरी हवालदिल होऊन आपल्या नशिबाला दोष देत असतो पण यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जों शेतीचा दवाखाना विकाशित केला जाणारं आहे त्यात शेतीची आरोग्य पत्रिका तयार केल्या जाईल जेणेकरून शेतीच आरोग्य सुधारलं जाईल व उत्पन्नात वाढ होईल, पर्यायाने शेतकरी शेतीत जास्तीत जास्त उत्पन्न घेईल आणि त्यांची वाटचाल समृद्धीकडे जाईल.