Home चंद्रपूर सनसनिखेज :- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांनी मृतक व्यक्तीला जिवंत दाखवून केली...

सनसनिखेज :- उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांनी मृतक व्यक्तीला जिवंत दाखवून केली गाडीची रजिस्ट्री?

रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार परंतु उपप्रादेशिक अधिकारी किरण मोरे यांनी देवाघेवाण करून प्रकरण दडपलं?

आरटीओचा झोल भाग -3

उपप्रादेशिक परिवहन हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून त्या भ्रष्टाचाराला किरण मोरे हे शिष्टाचार समजून खुलेआम कायदा पायदळी तुडवत आहे, जिथे सर्वसामान्य जनतेच्या वाहनांना चालन व कारवाया करून त्यांना जेरीस आणल्या जातं आहे तर मोठया ट्रान्सपोर्ट मालकाकडून पैसे घेऊन त्यांना खुली सूट देत आहे, दरम्यान तेलंगना बॉर्डरवर बेकायदेशीर सिमा नाक्याच्या नावावर कोट्यावधी रुपयाची वसुली करून किरण मोरे या अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाची चल अचल संपत्ती जमा केली असल्याची बाब आता उघड होत आहे, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची ईडी कडे तक्रार केली असतांना आता पुन्हा एक सनसनिखेज मामला समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे

मागील वर्षी वाहन क. एम.एच. ३४ एबी. ६८०३ ची टाटा कंपनीच्या झेनान या गाडीची माहीती अधिकारात माहीती मागीतली होती. त्या गाडीचे मालक किसन नानाजी कुंभारे रा. शिव मंदीर वार्ड बायपास रोड चंद्रपुर असुन तो इसम सन २०२१ मध्ये लॉकडाउन मध्ये मरण पावला होता. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपुर यांनीचं दिलेल्या माहितीवरून इसम हा सन २०२१ मध्ये मरण पावला असतांना सन २०२२ मध्ये मृतक किसन कुभारे रा. चंद्रपुर यास जिवंत दाखवुन त्याचे गाडीची (ट्रान्सफर) रजिस्ट्री करून दिली असल्याची बाब उघड झाली होती, दरम्यान त्या (ट्रान्सफर) रजिस्ट्री मध्ये ट्रान्सपोर्ट विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची साठगांठ असल्यामुळे मृतक किसन कुभारे यास जिवंत दाखवुन एम.एच. ३४ एबी. ६८०३ ची रजिस्ट्री एकनाथ सुरेश एकोणवार रा. चेक दरूर यांच्या नावाने रजिस्ट्री करून दिली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांच्याच आदेशाने सदर गाडीची रजिस्ट्री करण्यात आल्याची माहिती असून या दरम्यान शेकडो गाड्यांच्या बोगस रजिस्ट्री केल्या गेल्या असल्याचा संशय बळावला आहे, या संदर्भात गाडी क. एम.एच. ३४ एबी. ६८०३ या गाडीची बोगस रजिस्ट्री करून दिली अशी तकार पोलीस स्टेशन रामनगर यांचेकडे केलेली होती. मात्र पोलीस स्टेशन रामनगर येथील तपाशी अधिकारी धोबे याचेकडे मृतक यांचे मूत्यु प्रमाणपत्र दिलेले असताना सुद्धा त्यांनी सदर तकार अर्जाची चौकशीन करता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याने या संदर्भात आता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी आक्रमक होऊन परत पुन्हा परिवहन आयुक्त मुंबईला व ईडी कडे तक्रार करणारं असल्याची माहिती आहे.

किरण मोरे यांना कोण वाचविणार?

दररोज हजारो गाड्यांचे पासिंग, गाड्यांचे फिटनेस व ड्रायविंग लायसन्स च्या नावावर अतिरिक्त पैशाची लूट खाजगी एजंट च्या माध्यमातून करणारे आणि एंट्री फी च्या नावावर महिन्याला 5 कोटी पेक्षा जास्त वसुली ट्रान्सपोर्टर कडून करणारे किरण मोरे हे महिन्याकाठी किमान 8 कोटी रुपयाची उलाढाल करतात अशी शक्यता आहे, त्यातून कुणाला किती हिस्सा मिळतो आणि बाकी रक्कम जाते कुठे यांची चौकशी आजपर्यंत झाली नाही, पर्यायाने किरण मोरे एवढे बिनधास्तपणे वागतात की जणू त्यांच्या कार्यालयात सगळं व्यवस्थित आणि कायद्याने काम सुरु आहे, इथे खाजगी एजंट तर कार्यालयीन दस्त घेऊन असे फिरतात की जणू त्यांना इथे कायमस्वरूपी नौकरी लागली आहे, परंतु तो मी नव्हेच या नौटंकी भूमिका बजावणारे किरण मोरे यांना वरिष्ठ स्थरावरून पाठबळ मिळतं आहे त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून त्यांच्या नार्को टेस्टची मागणी करून त्यांच्या भ्रष्टाचाराचे धिंडवडे उडवले जाणारं आहे, त्यामुळं आता किरण मोरे यांना कोण वाचविणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here