Home चंद्रपूर धकादायक ताडोबाच्या वडाळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच लाखोचा भ्रष्टाचार उघड. वर्षभराआधी प्रमाणकावर सह्या घेतल्या...

धकादायक ताडोबाच्या वडाळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच लाखोचा भ्रष्टाचार उघड. वर्षभराआधी प्रमाणकावर सह्या घेतल्या मात्र रक्कम  नाही….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

धकादायक ताडोबाच्या वडाळा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच लाखोचा भ्रष्टाचार उघड. वर्षभराआधी प्रमाणकावर सह्या घेतल्या मात्र रक्कम  नाही….

चंद्रपूर :-  वन्य प्राण्यांपासून शेतीचे नुकसान झाल्यास दिनांक २/७/१०, ५/९/१३, २५/११/१३, आणि दिनांक ९/७/१५ च्या शासन निर्णयानुसार पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची रक्कम दिल्या जाते.

शेतपिकाच्या नुकसानीची शहानिशा करण्यासाठी संबंधित सरपंच, ग्रामसेवक अथवा तलाठी आणि कृषी अधिकारी किंवा फलोत्पादन अधिकारी अशा चार सदस्यांच्या समितीने दहा दिवसाच्या आत मोक्यावर पोहोचून पंचनामा करून नुकसान क्षेत्राचे मोजणी करून नुकसानीचे मूल्य ठरवून 30 दिवसाच्या आत सदर लाभार्थ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्याची कार्यवाही पूर्ण करावे.

अशी तरतूद शासन निर्णयात नमूद होती. परंतु वेळेचा अपव्यय होऊ नये. व अल्पावधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. हा प्रामाणिक हेतू वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समोर ठेवून व त्यात बदल करून वनरक्षक, वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर तीन दिवसाच्या आत प्रकरण निकाली काढण्याचे जबाबदारी देण्यात आली.

परंतु प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार ताडोबाच्या वडाळा स्थित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे सर्व कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करूनही मागील वर्षभराहून अधिक काळापासून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रकमेचा रुपयाही दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे आष्टा येथे क्षेत्र सहायकाचे कार्यालय आहे.

परंतु आष्टा, वडाळा, सोनेगाव, काटवल, घोसरी व इतर गावच्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभापासून सदरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वंचित ठेवले असल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे गावांच्या शेतकऱ्यांच्या सह्या प्रमाणकावर घेण्यात आल्या. मात्र त्यांना रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे जवळपास 50 ते 60 लाभार्थी प्रमाणावर सह्या करूनही आर्थिक लाभापासून वंचित आहेत .

त्यामुळे वडाळाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर लाभार्थ्यांची तीव्र नाराजी असून अशा बेजबाबदार व भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्याची एकमुख मागणी होत आहे. तसेच सदरचे नीतीभ्रष्ट असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी यांची उचल बांगडी करून तातडीने पीक नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना रक्कम अदा करण्यात यावी.अशीही मागणी लाभार्थी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here