Home वरोरा संतापजनक :- ज्ञान मंदिराचं पावित्र्य संपविणाऱ्या वरोरा येथील त्या शिक्षकांचं करायचं काय?

संतापजनक :- ज्ञान मंदिराचं पावित्र्य संपविणाऱ्या वरोरा येथील त्या शिक्षकांचं करायचं काय?

पोलिसांनी आरोपी शिक्षकांना पकडले, वरोरा बंद ची हाक पण जनतेच्या आक्रोशाचे काय ?

वरोरा प्रतिनिधी :-

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत शिकणाऱ्या दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरण उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले असतांना आता वरोरा येथील अल्पवयीन विद्यार्थिनीला मिठी मारण्याची मागणी व छेडखानी करणाऱ्या एका नामांकित शाळेतील दोन शिक्षकांवर विनयभंग व बाळ लैंगिक अत्याचार कायज्ञातर्गत गुन्हे दाखल झाले व जनतेचा रोष बघता पोलिसांनी त्या दोन आरोपी शिक्षकांना अटक केली, दरम्यान काल हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे संबंधित दोषी शिक्षकांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी रेटून धरली होती, त्यानंतर दोन शिक्षकांचे निलंबन सुद्धा करण्यात आले, मात्र शाळेच्या ज्ञान मंदिराचे पावित्र्य स्वतः ज्ञानगुरूच भंग करत असेल तर ज्ञान घेणाऱ्या मुलांच्या भविष्याचे काय? हा मोठा गंभीर प्रश्न आहे, दरम्यान या घटनेच्या विरोधात वरोरा शहरातील सर्व संस्था दुकाने बंद ठेऊन संताप व्यक्त करण्याचा निर्णय काही कार्यकर्त्यांनी घेतला, मात्र या घटनेने तालुक्यातील सर्व पालकवर्ग संतापून आहे तर युवा कार्यकर्ते सुडाच्या भावनेने पेटलेले आहे, त्यामुळं ते नेमके काय करतील याचा नेम नाही एवढा आक्रोश व्यक्त होतं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

वरोरा येथील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात 2 शिक्षकांनी 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे अशी आरोपी शिक्षकांची नावं आहेत. आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावलं होतं. वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून या आरोपी शिक्षकांनी तिच्याकडे मिठीची मागणी केली. तिने घाबरून पळ काढण्याचा प्रयत्न करताचं त्यांनी बळजबरी केली त्यामुळं भीतीने पळून आलेल्या पीडित मुलीने पालकांना याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पालकांनी वरोरा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. वरोरा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली व पोलिसांनी आरोपी शिक्षकांच्या विरोधात पॉक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी दोन्ही शिक्षक फरार झाले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सायबर टीम ला सोबत घेऊन आरोपी शिक्षकांना चंद्रपूर वरून अटक केली.

आरोपी शिक्षकांचे आतापर्यंतअनेक कारनामे?

महिन्याकाठी मिळणारा लाखांच्या वर पगार व त्यामुळे मौजमजा करून पैसे उधळण्याची सवय जडलेले प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे या दोन शिक्षकांचे कित्तेक कारणामे समोर येत आहे, शाळेच्या मुलीकडे वासनांध नजरेने बघणाऱ्या या शिक्षकांनी कित्तेक मुलींना आपल्या वाईट नजरेची शिकार बनवले असल्याची चर्चा आहे, रंगेल स्वभाव व पैशाचा माज चढल्याने त्यांनी शिक्षकी पेशाला कलंकित तर केलेच पण शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य सुद्धा पायदळी तुडवले, त्यामुळे अशा नराधम शिक्षकांना आजीवन कारवास देऊन त्यांच्या कर्माच प्रायचित्त भोगण्यास बाध्य करणं एवढं कार्य आता न्यायालयावर अवलंबून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here