कोळसा चोरी प्रकरण :
सत्तूरने हमला केल्याने एक गंभीर जखमी तर तिघांना साधारण मार, कैलास अग्रवालचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयात दाखल, पोलिसांच्या कारवाईकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष !
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर तालुक्यातील नागाडा कोळसा टाल वरून कोळशाचे पकडलेले २६ ट्रक आणि तिघांवर दाखल केलेले गुन्हे इथपर्यंत प्रकरण सर्वांना माहीत आहे, पण हे प्रकरण त्याहीपेक्षा भयंकर असून कोळशाच्या या व्यवसायात गुंड प्रवृत्तीचे लोक कैलास अग्रवाल यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असल्याने या कोळसा कांड प्रकरणात अग्रवालच्या दोन गुटात व्यवसायावरून धारदार शस्त्राने टोळीयुद्ध रंगले असून यामधे ट्रान्सपोर्ट युनियनचे सचिव गंभीर जखमी असल्याचे बोलल्या जात आहे, मात्र हे प्रकरण वाढू नये व कुणावरही गुन्हे दाखल होऊ नये याकरिता हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात अग्रवाल बंधु असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
नुकतेच सोमवार १ मार्च २०२० ला कोळसा चोरीच्या व्यवसायीक वादावरून ट्रक मालकांमध्ये जिवघेणे टोळीयुद्ध घडले. यामधे कोळसा माफिया अग्रवाल बंधु असल्याचे बोलल्या जात आहे, या प्रकरणाची तक्रार होऊ नये, यासाठी अग्रवाल प्रयत्नात होते मात्र पोलिस विभागानी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपास केल्यास कोळसा चोरी प्रकरणाचे खोलवर आणखी धागेदोरे हाती लागु शकेल अशी शक्यता असतांना हे प्रकरण शेवटी आपसात मिटविण्यात आल्याचे कळते.
नुकतेच नागाडा येथे घडलेले कोळसा चोरी प्रकरण राज्यात गाजत असतांना आता कैलास अग्रवालच्या अधिनस्त असलेल्या ट्रान्सपोर्ट युनियनच्या सचीवावर झालेला सत्तूरने प्राणघातक हमला ही बाब पोलिसांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवी होती कारण अगोदरच या कोळसा चोरी प्रकरणात तक्रारदार नाही म्हणून कारवाईसाठी महाराष्ट्र स्टेट मायनिंगच्या अधिकाऱ्यांना समोर करून व कोळसा माफियांच्या दबावाला बळी न पडता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कोकाटे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक बोबडे यांनी कोळसा माफियांवर भा.द.वी कलम 464,465, 468,471,420, 34 आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल केले.
चंद्रपूर न्यायालयात कैलास अग्रवाल व इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज निकालाच्या प्रतीक्षेत ?
कैलास अग्रवाल आणि त्यांच्या सहकारी ट्रान्सपोर्टरवर दाखल केलेल्या गुन्ह्यात स्थानिक चंद्रपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज आरोपींनी दाखल केला आहे, या जामीन अर्जावर न्यायालयाने अजून निकाल दिला नसला तरी तो जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळला जाण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे शेवटी आरोपींना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल असे चित्र आहे.
कैलास अग्रवाल यांची चोरीच्या कोळशाची वाहतूक सुरूच ?
नागाडा कोळसा चोरी प्रकरणात काही ट्रान्सपोर्ट धारकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यांचे मोक्यावरील ट्रक ही ताब्यात घेतले. पण अजूनही अग्रवाल बंधूच्या आशिर्वादाने व संगनमताने हा व्यवसाय सुरूच असून ज्या ट्रक (ट्रान्सपोर्ट) मालकांवर गुन्हे दाखल झाले असल्याचा लाभ घेऊन या प्रकरणाला अन्य मार्गाने भटकविण्यात यश मिळविले असल्याचे दिसत आहे. कारण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते ट्रक (ट्रान्सपोर्ट) चालक आजही सुरळीतपणे आपला व्यवसाय करीत आहेत. हाती आलेल्या सुत्रांनुसार आजच्या स्थितीत पद्मापूर, डी.आर.सी. या खाणीतून मोठ्या प्रमाणात अग्रवाल यांचा चोरीचा कोळसा वाहतूक केल्या जात आहे. ज्या युनियनचे व मालकांचे ट्रक यापुर्वी पोलिसांनी पकडले होते, तेच ट्रक मालक अग्रवाल यांच्या इशाऱ्यावर जोमाने पुन्हा यात सक्रीय झालेले आहेत.
मिळालेल्या विश्र्वसनीय सुत्रानुसार, नागाडा येथे ज्या नोंदणीकृत ट्रान्सपोर्ट कंपनी चे ट्रक पकडले गेले व त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्यात आली व जे ट्रान्सपोर्टर कैलास अग्रवाल यांच्या इशाऱ्यावर कोळसा चोरी करीत आहे, त्याच दोन गुटामध्ये चोरीचा कोळसा वाहतुकीवरून नुकतीच धारदार हत्याराने गंभीर स्वरूपाची हाणामारी झाली. यात ट्रान्सपोर्ट कंपनी चा सचिव गंभीररित्या जखमी झाला असून प्रकरण वाढू नये यासाठी अग्रवाल यांनी मध्यस्थी केल्याचे बोलल्या जात आहे.