Home कोरपणा शेवटी रेती तस्कर आणि पोलिस प्रशासनाने डाव साधला, पत्रकारांना तक्रार मागे घेण्यासाठी...

शेवटी रेती तस्कर आणि पोलिस प्रशासनाने डाव साधला, पत्रकारांना तक्रार मागे घेण्यासाठी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी ?

रेती चोरी प्रकरण :-

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ? एक रेती तस्कर बोलतो यामावार साहेब आम्हचे सोबत ! 

गडचांदूर प्रतिनिधी :-

कायद्याचे रक्षकच कसे भक्षक असतात याचे मुर्तिवन्त उदाहरण नुकतेच प्रकाशात आले आहे. गडचांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेतीघाटातून बेकायदेशीर रेती तस्करी खुलेआम होत असतांना व जिथे तहसीलदार आणि पोलिस प्रशासन अंध बहीर आणि गुंग झालं असतांना पत्रकारांनी राष्ट्रीय संपत्तीची जी चोरी होते आहे त्याचा भांडाफोड करण्यासाठी  प्रत्यक्ष रेती घाटावर जावून फोटो आणि विडिओ घेतले असता त्यांच्यावरच रेती तस्करानी प्राणघातक हल्ला करून एका हस्तक आडनावाच्या पत्रकाराचा वायरने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तर दोन पत्रकारांना धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची हवा सोडली आणि गाडीतील पेट्रोल सुद्धा काढले, या संदर्भात पत्रकारांनी पोलिस स्टेशन मधे संपर्क करून पोलिसांची मदत मागितली मात्र अगोदरच पोलिसांची रेती माफियांसोबत साठगांठ असल्याने रेती माफियांवर गुन्हे दाखल होऊ नये याकरिता रेती माफियांना सुद्धा पत्रकारांविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनीच दिला होता. इकडे पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रेड्डी यांना भ्रमणध्वनीवर या प्रकरणाची माहिती दिल्याने त्यांच्या दबावामुळे कसे तरी पोलिस निरीक्षक भारती तय्यार झाले खरे पण उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांच्यासोबत सल्लामसलत झाल्यानंतर हे प्रकरण इथेच थांबवण्यासाठी एका पत्रकाराला व ज्या पत्रकारावर जीवघेणा हमला झाला त्याला पोलिसांनी धमकावून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला आणि शेवटी जणू आपसात समझोता झाल्याचे चित्र उभे करण्यात आले. विशेष म्हणजे एका रेती तस्करानी उपविभागीय पोलिस अधिकारी आम्हचे सोबत असल्याचे पत्रकारांशी बोलल्यामुळे रेती तस्कर आणि पोलिस प्रशासन चोर शिपायाचा कसा खेळ खेळतात हे दिसून येते,
आवारपूर परिसरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात यामावार हे जणू पोलिस महासंचालक असल्याचा आव आणतात, तिथे जाणारे अभ्यागताना सुद्धा जणू आरोपी असल्यागत खालून वरपर्यंत तपासले जाते मात्र त्याचं आवारपूर परिसरात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावर खुलेआम दारू विकल्या जाते, तिथे यांची शिस्त कुठे जाते हे कळत नाही, इकडे राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम तस्करी होतं असतांना त्यांना हे जणू क्लीनचिट देतात मग यांचा “सदरक्षणाय खलनिग्रहनाय” हा धर्म जातो कुठे ? हा प्रश्न पडतो. यामधे पोलिस निरीक्षक भारती सुद्धा बरोबरचे भागीदार आहेतच कारण त्यांनी पोलिस स्टेशनचे सर्व सूत्र स्वतःकडे ठेवून सर्व अवैध व्यावसायिकांसोबत साठगांठ केली असल्याची चर्चा आहे.पोलिस कल्याण निधी करिता आयोजित आर्केस्ट्रा करिता सर्वात मोठी रक्कम जमविण्याऱ्या पोलिस निरीक्षक भारती यांचा सन्मान व्हायलाच हवा पण ही रक्कम नेमकी कुणाकडून जमवली याची माहिती काढली तर सिमेंट कंपन्या सोडून बहुतांश रक्कम ही अवैध व्यावसायिक यांचेकडून जमविल्याचे बोलल्या जात आहे, एकूणच पोलिस प्रशासनाकडून अवैध धंदेवाल्यांना संरक्षण मिळत असल्याने राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम लूट सुरू आहे , मात्र या विरोधात आवाज उठविणाऱ्या पत्रकारांनाच गुन्ह्यात फसवीण्याचे छडयंत्र पोलिस अधिकारी करीत असेल तर पोलिस प्रशासन देशद्रोह करीत आहे, हे वरील प्रकरणातून दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here