कोळसा चोरी प्रकरण :-
कौशल सिंह या सुरक्षा रक्षकांवर झाला होता हमला, त्यातील सहा आरोपी अजूनही फरार, कोळसा तस्कर पुन्हा सक्रिय, घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल!
चंद्रपूर प्रतिनिधी :–
एकीकडे पैनगंगा कोळसा खाणीतील सुरक्षा रक्षक कौशल सिंह यांच्यावर झालेल्या हमल्याची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा एका वैभव निमकर नावाच्या वेकोलि सुरक्षा रक्षकावर घूग्गूस येथील बँकर जवळ प्राणघातक हमला काल दिनांक २ मार्चला सायंकाळी ४,१५ वाजता झाल्याने कोळशाच्या या धंद्यात बिहारी गुंडाराज सुरू असल्याने या संदर्भात पोलिसांनी कडक पावले उचलण्याची आवशकता आहे.
केवळ सबसिडीचाच कोळसा चोरी केल्या जात नाही तर वेकोलि अधिकाऱ्यांना धमकावून खुलेआम कोळसा खाणीतून आणि कोळसा सायडिंग कोळसा चोरी सुद्धा केल्या जात असतो, त्यामुळे आपली गाडी कोळसा भरण्यासाठी आगोदर लागावी याकरिता काही गुंड सक्रिय असून जर त्यांच्या मतानुसार अधिकारी किंव्हा सुरक्षा रक्षक ऐकले नाही तर त्यांच्यावर हमला करण्यात येतो अशाच माफियांद्वारे मागील वर्षीच्या सप्टेंबर मधे पैनगंगा वेकोलि कोळसा खाणीतून कोळसा लुटीची घटना घडली होती.त्यामधे बेलोरा टी पॉईंट स्थळावर दिवसाढवळ्या कोल माफियांनी बंदूकीच्या नोकवर २० ते २५ लोकांना धमकावले होते. शिवाय पैनगंगा वेकोलितील कौशल सिंह नामक सुरक्षा रक्षकावर तब्बल १२ असामाजिक तत्वांच्या लोकांनी हमला करून गंभीर जखमी केले होते, यामधे ऐकून १२ आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते पण अजूनही सहा आरोपी त्या प्रकऱणामधे फरार आहे.
एका महिन्याच्या अंतरात तब्बल दोन गंभीर हमले वेकोलि सुरक्षा रक्षकावर कोळसा माफियांनी केल्यामुळे व नागाडा कोळसा टाल मधे २६ चोरीचा कोळसा वाहतूक करणारे ट्रक पकडल्या गेले असल्याने कोळसा माफिया चंद्रपूर जिल्हाचा बिहार करीत आहे की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कौशल सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी सह सुरक्षा रक्षक वैभव निमकर यांच्यावर झालेल्या हमल्यातील आरोपींना तत्काळ अटक करून पोलिसांनी या गुंड कोळसा माफियांवर जिल्हाबंदी करावी अशी मागणी आता जोर पकडू लागली आहे.