कितीचा जुगार किती चा दाखवला? खरंच जुगारात सापडलेली नगदी कैश पोलिसांनी जाहीर केली? हॉटेल मालकावर गुन्हा दाखल होणार?
चंद्रपूर :–
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या खून, बलात्कार, विनयभंग अशा घटना सतत घडत असतांना आता धनदांडग्यांचे आंबट शौक जुगाराच्या माध्यमातून समोर आले आहे. शहरातील धनदांडग्यांचा आंबट शौक पूर्ण करण्याचा अड्डा बनलेल्या एन डी हॉटेल मध्ये पोलिसांनी नुकतीच धाड टाकून जुगाराचा पर्दाफाश केला. शहरातील नामांकित बिल्डर गजानन निलावार यांचा मुलगा अंकित सह 9 जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान 15 लाखांची रोकड आणि अन्य उपकरणे देखील पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती आहे, पण विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम 35 लाखांच्या वर असल्याचे समजते, परंतु गोपनीयतेचा आधार घेऊन पोलिसांनी ज्या आरोपीना जुगारात पकडले त्यांच्या नावापेक्षा ही रक्कम मोठी नसल्याने पोलिसांच्या सुरात आरोपीचे सूर मिळतं असल्याचे बोलल्या जातं आहे.
समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यावसायिकांची मुलं कधी बिघडली व कधी वाममार्गाला लागली याची पर्वा नसलेल्या या धनदांडग्यांना या घटनेपासून मात्र मोठा धडा मिळाला आहे, कारण त्यांच्या मुलांनी केलेल्या आंबट शौक मुळे या धनदांडग्यांची कौटुंबिक प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. अवैध मार्गाने पैसा व बापजाद्यापासून आलेली मालमत्ता धनदांडग्यांची मुलं आंबट शौक पूर्ण करून उडवितात आणि त्यासाठी एन डी हॉटेल चे संचालक त्यांच्या या जुगार खेळाला परवानगी देतात हा मोठा गंभीर प्रकार असून ज्या पद्धतीने जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तसे एन डी हॉटेल च्या मालकावर पण गुन्हे दाखल व्हायला हवे अशी मागणी होतं आहे.
कोण आहेत ते जुगार खेळाडू?
एन डी हॉटेल च्या धाडीत ताब्यात घेतलेल्या 9 व्यक्तींमध्ये शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबातील लोकांचा समावेश असल्याचे समजते. त्यात शहरातील एक नामांकित बिल्डर गजानन निलावार चा मुलगा अंकित निलावार हा मुख्य आरोपी असून त्याच्याच नावाने रूमची बुकिंग करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात जोरदार चर्चा सुरू असून ते जुगारी कोण याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. या जुगारात अंकित गजानन निलावार,राजेन्द्र महादेव नाईक, लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरी अमवार, नरेश भगवान मुन, यशवंत हिरामन रत्नपारखी, विलास सदाशीव खडसे, मयुर भाग्यवान गेडाम, शामराव हिरामन थेमस्कर, अजय मधुकर वरकड यांना जुगार खेळताना काल रात्री रामनगर पोलिसांनी धाड टाकली असता अटक केली. नागपूर मार्गावरील प्रसिद्ध एन.डी. हॉटेलमध्ये रविवारी रात्री घडलेल्या या घटनेने धन दांडग्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणी पोलिस योग्य तपास करून एन डी हॉटेल च्या मालकावर ज्यांनी हा जुगार भरविण्यास मदत केली त्यांच्यावर कारवाई करणार की राजकीय दबावाने या प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात टाकणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.