Home चंद्रपूर विजेचा शॉक लागून मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून सांत्वन गणेशपुर...

विजेचा शॉक लागून मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून सांत्वन गणेशपुर येथे काल घडलेल्या घटनेत झाला होता ४ जणांचा मृत्यू

विजेचा शॉक लागून मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांकडून सांत्वन

गणेशपुर येथे काल घडलेल्या घटनेत झाला होता ४ जणांचा मृत्यू

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर

ब्रह्मपुरी:-वन्यप्राण्यांपासुन शेत पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेताच्या बांधावर तार लावत असतांना अचानकपणे त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण ह़ोऊन चार जणांना आपला जीव गमवावे लागल्याची घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील शेत शिवारात घडली. याची माहिती मिळताच आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी गणेशपुर व चिचखेडा येथे सदर मृतकांच्या घरी भेट देत कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.

कधी असमानी संकट तर कधी वन्य प्राण्यांचे हल्ले यातून जीविताचा धोका पत्करुन शेती व्यवसाय करणाऱ्यांना वन्य प्राण्यांकडुन शेतपिकांची नासधूस करून हैराण करून सोडल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत आहेत. अश्यातच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातून शेत पिकांना वाचविण्यासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथील प्रकाश राऊत, नानाजी राऊत शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर तार लावण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी गावातील युवराज डोंगरे व शेजारच्या चीचखेडा येथील पुंडलिक मानकर या रोजंदाराना कामावर बोलाविले.
शेताच्या बांधावर तार लावण्याचे काम सुरू असताना नियतीने घात केला. व जवळच असलेल्या जीवंत विद्युत ताराच्या खांबाला तार गुंतून त्यातून विद्युत प्रवाह कुंपणाच्या तारात येऊन कुंपण करणाऱ्यांपैकी पाचही जणांना विद्युत प्रवाहने घात केला.व यात प्रकाश राऊत, नानाजी राऊत, युवराज डोंगरे व पुंडलिक मानकर या चौघांचा अनावधानाने मृत्यू झाला. तर सदर घटनेत एकाला गंभीर दुखापत झाली. आज राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार तालुका दौरावर असताना त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेत तात्काळ गणेशपुर व चीचखेडा गाठून घटनेतील मृत्तकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत देत इतरही शासन योजनेचा लाभ मिळवून देणार अशी ग्वाही दिली. यावेळी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, चिचखेड सरपंच संजना घुटके, सिंदेवाही काॅंग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, तहसीलदार सतीश मासाळ, गटविकास अधिकारी रविंद्र घुबडे, पं.स.कृषी अधिकारी चौधरी, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी जि.प.सदस्य भावना ईरपाते, उपसरपंच सुरेश ठीकरे, माजी कृउबा सभापती मनोहर गजबे यांसह ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here