Home चंद्रपूर संतापजनक :- भ्रष्टाचारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची ईडी चौकशी थांबली कुठे...

संतापजनक :- भ्रष्टाचारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांची ईडी चौकशी थांबली कुठे ?

कोण आहेत मोरे यांचे गॉडफादर? भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या आरटीओ कार्यालयात जनतेची आर्थिक लूट कधी थांबणार?

आरटीओ चा पंचनामा भाग – 4 :-

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यलयात भ्रष्टाचाराचा सरदार म्हणून ज्यांची ख्याती आहे ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या मार्फत कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचाराची ईडी मार्फत चौकशी कारण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर तिवारी यांनी ईडी कार्यालयात केली होती, दरम्यान या तक्रारीला जवळपास महिना लोटून गेल्यानंतर सुद्धा ईडी ची धाड का पडली नाही व किरण मोरे सह सहाय्यक प्रादेशिक अधिकारी मेश्राम यांच्यावर कारवाई का झाली नाही? हा प्रश्न उभा ठाकला असून किरण मोरे यांनी ईडीला पण मैनेज केले असेल का? हा गंभीर प्रश्न आहे, कारण खुलेआम आरटीओ कार्यालयात भ्रष्टाचार होतं असतांना ह्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना ईडी मार्फत अभय मिळतं असेल तर मग हे सरकार आणि तपास यंत्रणा भ्रष्टाचाऱ्यांना मोकळीक देऊन बिहार बनवायला निघाले का? असा संतप्त सवाल जनतेसमोर उभा ठाकला आहे.

या कार्यालयात बेबंदशाही एवढी माजली आहे की या कार्यालयातील दलालच कर्मचारी म्हणून प्रशासनाच्या फाईल्स घेऊन फिरतात, जिथे सरकारी दस्त हा खाजगी लोकांच्या हातात देणे गैर आहे तिथे या कार्यालयात पैसे वसुल करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे ते पैसे पोहचविण्याचे काम हे दलालच करत असल्याने हे कार्यालय सर्वसामान्य जनतेची आर्थिक लूट करणार व भ्रष्टाचाराचा अड्डा बनलं आहे, विशेष बाब म्हणजे लाखों रुपयाचे सिसिटीव्ही यंत्रणा घेतल्याचे बिल या कार्यालयातून देण्यात आले ते सिसिटीव्ही नेमके कुठे बसवले आहे याचा पत्ताच नाही मात्र दलालांना सोईच होईल आणि पैसे घेता वेळेस सिसिटीव्ही मध्ये ते चित्र येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी सिसिटीव्ही यंत्रणा चुकीच्या ठिकाणी लावून आपण पारदर्शक काम करतो असे दाखविण्याचा खेळ भ्रष्टाचारी किरण मोरे खेळत असल्याने आता या किरण मोरेचा गॉडफादर कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. दरम्यान मोरेची ईडी चौकशी थांबली कुठे? याचा शोध घेण्यासाठी मनसेची टीम मुंबई ईडी कार्यालयात जाणारं असल्याची माहिती आहे.

घोडपेठ जवळ RTO गाडीने दिलेल्या धडकेत अधिकाऱ्यांवर गुन्हे का नाही?

रविवारला सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे हे आपल्या निरीक्षकांना वसुली करिता पाठवितात व त्यापासून लाखों रुपयाची वसुली केल्या जाते त्याचं उद्देशाने मागील रविवारला घोडपेठ येथे RTO च्या वसुली पथकांच्या गाडीने दोन गाईना एवढी जोरात धडक मारली की एक गाय जाग्यावरच मरण पावली तर दुसरी गंभीर जखमी होती मात्र आपले पितळ उघडे पडेल या भीतीने त्या RTO अधिकाऱ्यांनी भद्रावती पोलीस स्टेशन मध्ये शेतकऱ्यांना बोलावून धमकी दिली की तुम्ही 30 हजार घ्या आणि मामला रफदफा करा पण शेतकऱ्यांचे जवळपास दीड लाखाने नुकसान झाल्याने त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनं येथे तक्रार केली मात्र अजूनही त्या RTO अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले नाही व शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळं RTO अधिकाऱ्यांवर कार्यवाही होण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here