अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
भाविकांसाठी सुविधा; जवळच्या पोस्टातून घ्या आता गंगाजल
चंद्रपूर :- भारतीय संस्कृतीमध्ये गंगा नदीचे जल, पवित्र जल म्हणून मानले जाते. अनेक धार्मिक विधींमध्ये या गंगाजलाला विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यात उपयुक्त पवित्र गंगाजलासाठी आता गंगोत्री किंवा ऋषिकेशला जाण्याची गरज नाही. केंद्र शासनाच्या योजनेनुसार डाक विभागामार्फत पोस्ट ऑफिसमध्ये गंगोत्री येथील बाटलीबंद गंगाजल संपूर्ण देशात उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयातसुद्धा हे गंगाजल विक्रीसाठी उपलब्ध आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
गंगाजल कशासाठी वापरले जाते
■ पूजा, धार्मिक विधीपूर्वी घराचे गंगाजल शिपडून शुद्धीकरण केल्याने घरात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते. सोबतच सनातन धर्मात गंगा नदीला मातेचे रूप मानले जाते. यामुळे गंगाजलात स्नान केल्याने मनुष्य पापांपासून मुक्त होतो, अशीही धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे गंगाजलाला मागणी असते.
कोठे मिळणार?
■ चंद्रपूर शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात गंगाजल विक्रीसाठी उपलब्ध आहे. पोस्टाच्या https://ep- ostoffice.gov.in या संकेतस्थळावर खाते उघडून आपली मागणी नोंदविता येते. त्यानंतर नागरिकांना पोस्टाद्वारे घरपोच गंगाजल उपलब्ध केले जाईल. घरपोच सुविधा देण्याचे अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
किंमत किती?
गंगाजलच्या २५० मिलीच्या बाटलीसाठी ३० रुपये आकारले जातात. घरपोच ऑनलाइन ऑर्डर केल्यास १२१ रुपये आकारले जातात. चंद्रपूर शहरातील पोस्ट कार्यालयात गंगाजल उपलब्ध आहे. दरम्यान, अन्य पोस्ट कार्यालयात मागणी नुसार ग्राहकांना पुरवठा केला जातो,
विविध धार्मिक विधीमध्ये गंगाजलाला विशेष महत्त्व आहे. मात्र ज्यांना गंगाजल आणण्यासाठी जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी पोस्टामार्फत शहरात गंगाजल उपलब्ध करण्यात आले आहे. नागरिकांचाही गंगाजल विकत घेण्यासाठी उत्तम प्रतिसाद मिळत आहे. – एस. रामा कृष्णा, प्रवर डाक अधीक्षक, चंद्रपूर,