Home चंद्रपूर सावली येथे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

सावली येथे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

सावली येथे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

नगरपंचायत हद्दीत सिमेंट रस्ते, चौक सौंदर्यीकरण व नाली बांधकामांचा समावेश

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

सावली:-राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकां प्रति असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली. सदर क्षेत्राचा ना भूतो न भविष्यती असा विकास साधण्यात विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांना तोड नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या विकास कामांचा झंजावात कायम राखत सावली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटींचा विकास निधी मंजुर करून नुकताच या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

आज भूमिपूजन सोहळा पार पडलेल्या विकास कामांमध्ये प्रभाग क्र. ३ मध्ये सांडपाणी नाली बांधकाम, प्रभाग १५ मध्ये सिमेंट काँक्रीट रोड, प्रभाग ११ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड, प्रभाग १२ मध्ये सिमेंट काँक्रिट रोड व पाईप नाली बांधकाम, प्रभाग १४ मध्ये सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम, प्रभाग २ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विजयस्तंभाचे भूमिपूजन व सौंदर्यकरण करणे , प्रभाग ७ मध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व सौंदर्यकरण करणे, तथा सावली नगरपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामे यांचा समावेश आहे.

आयोजित भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार , माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चिटणुरवार, तालुका काँग्रेस अध्यक्ष नितिन गोहणें, महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर , उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम चुदरी, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, सभापती नगरपंचायत सावली प्रीतम गेडाम, सभापती नगरपंचायत .सिमा संतोषवार , प्रियंका रामटेके नगरसेवक, नितेश रस्से गुणवंत सुरमवार नगरसेविका साधना वाढई ,अंजली देवगडे, ज्योती गेडाम, ज्योती शिंदे व तालुका काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकारी तथा काँग्रेस पक्षाचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here