Home चंद्रपूर खेदजनक :- 200 युनिट च्या मामला अंगलट आल्याने जोरगेवार यांचा तळतळाट?

खेदजनक :- 200 युनिट च्या मामला अंगलट आल्याने जोरगेवार यांचा तळतळाट?

200 युनिट चा उल्लेख असणारे कांग्रेस चे संभावित उमेदवार महेश मेंढे यांचे बैनर काढले, जनतेत संताप?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

राजकारणात सरड्यासारखा रंग बदलवीणारा कुणी आमदार असेल तर त्यात सर्वात प्रथम नाव येत ते आमदार किशोर जोरगेवार, त्याचं कारणही तसंच आहे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला 200 युनिट मोफत मिळवून देतो असलं गाजर दाखवून मागील सन 2019 च्या निवडणुकीत तब्बल 72 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले जोरगेवार आता त्या 200 युनिट मोफत देण्याच्या आश्वासनावर मौन व्रत धारण करत आहे, जणू तो मी नव्हेच या आपल्या सदाबहार नाटकीय भूमिकेत चंद्रपूर च्या जनतेला ते उल्लू बनवत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया आता सर्वत्र उमटत आहे, दरम्यान कांग्रेस चे संभावित उमेदवार महेश मेंढे यांनी ज्या आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली महोत्सव सुरु केला त्या महाकालीच्या कृपेनें यंदाच्या नवरात्रात चंद्रपूरकरांना मोफत 200 युनिट चा आशीर्वाद मिळावा असे बैनर जेटपुरा गेट जवळ लावले ते बैनर बघून जोरगेवार यांचा तळतळाट झाला असल्याने त्यांनी ते बैनर काढायला लावले, पण मी म्हणेन तो कायदा अशा दडपशाही पद्धतीने जोरगेवार यांची जी रनणिती आहे ती आता त्यांच्याच अंगलट येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे, लोकशाही पद्धतीने आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य जर निवडून आलेला लोकप्रतिनिधी हिरावून घेत असेल तर मग खरंच अशा तानाशाह लोकप्रतिनिधी यांना जनता निवडून देणारं का? हा प्रश्नचं आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांचा इतिहास आणि वर्तमान सर्वानाचं माहीत आहे, मागील निवडणुकीत पर्याय नसल्याने व भाजप च्या लोकांनी शामकुळे या बाहेरच्या उमेदवाराला बाहेरचा रस्ता दाखवायचा प्रण केल्याने जोरगेवार यांचे फावले, आपला माणूस आणि सर्वसामान्य जनतेला 200 युनिट वीज मोफत देण्याच्या आस्वासनाला मतदार बळी पडले आणि जोरगेवार जिंकून आले, अपक्ष म्हणून जिंकून आल्यानंतर त्यांनी कुठंलनिमंत्रण नसताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला जाहीर पाठिंबा देत असल्याचं पत्र दिलं जे रेकॉर्डवर आहे, तर आता शिवसेनेने भाजप सोबत काडीमोड घेतल्याने भाजप ची सत्ता बसणारं नाही असे लक्षात येताच त्यांनी आपले रंग बदलवून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे धाव घेतली आणि महाविकास आघाडी सोबत घरोबा केला, मात्र महाविकास आघाडीची सत्ता एकनाथ शिंदे यांच्या बंडाखोरीने गेली आणि 50 खोक्यात आमदार विकल्या गेले त्यात किशोर जोरगेवार यांनी सुद्धा सुरत मार्गे गुहाहाटी गाठली हे सर्वाना माहीत आहे, त्यामुळे किशोर जोरगेवार यांना आता चंद्रपूर ची जनता हिसका दाखविण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी व त्यांना धार्मिक कार्यक्रमात अडकवून पुन्हा आमदार होण्याची रनणिती म्हणून त्यांनी महाकाली महोत्सव सुरु केला पण येथील जनता त्यांना 200 युनिट कुठे गेले यावर प्रश्न विचारत आहे मग ते सोसियल मीडियाच्या माध्यमातून असेल किंव्हा बैनर लावून पण त्यावर किशोर जोरगेवार यांची मात्र पुरती फजिती होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here