Home चंद्रपूर माना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कुकडहेटी...

माना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार कुकडहेटी येथे सामजिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा

माना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटीबद्ध – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

कुकडहेटी येथे सामजिक सभागृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

सिंदेवाही:-माना समाज हा पूर्वीच्या काळातील राज्यांचा वंशज होय. माञ मागील काही काळापासून या समाजाच्या सामजिक, शैक्षणिक आर्थिक समस्यांकडे दुर्लक्ष केल्या गेले. हा समाज अतिशय प्रामाणिक व एकनिष्ठ समाज असून या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी मी सदैव कटीबद्ध राहणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही तालुक्यांतील कुकडहेटी येथे आयोजित मॉ मानीकादेवी सामजिक सभागृह (अंदाजित किंमत १ कोटी रूपये) बांधकामाचा भूमिपूजन सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रमास उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, सत्कारमूर्ती म्हणून गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदर डॉ. नामदेव किरसान, डॉ . सतिश वारजुरकर, राहूल दडमल, विजय घरत, दादाजी चौके, रमाकांत लोधे, बाबुरावजी गेडाम, वामनराव सावसाकडे, हरिभाऊ बारेकर, शत्रुघ्न चौधरी, डॉ. मेघा सावसाकडे, नालिना चौधरी, सुषमा धारणे, परशुराम नन्नावरे, जानिक वाघमारे, प्रभाकर सावसाकडे, नितिन गोहने, रामचंद्र श्रीरामे, नरेश चौधरी, विश्वनाथ श्रीराम, सचिन दडमल, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, कुठलाही समाज असो त्या समजातील बांधवांनी एकसंघ होवून वज्रमूठ बांधली की समाजाचे प्रश्न मार्गी लागतात. माना समाजाला नेतृत्व उभे करण्यासाठीं जे पाठबळ हवे ते मी व क्षेत्र खासदार डॉ. कीरसान मिळून देऊ. या समाजातील जातपडताळणी संदर्भातील अडचणी, व ईतर महत्वाचे प्रश्न मी क्षेत्रं आमदार म्हनून प्राधान्यक्रमाने सोडविणार असेही ते यावेळी म्हणाले. तर माना समाजाने मला दिलेले प्रेम यामुळें या समाजाचा मी सदैव ऋणी असुन या समजाच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्ध राहणार अशी ग्वाही देखील यावेळी बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. उपस्थितांना मार्गदर्नशन करतांना खासदार डॉ नामदेव किरसान यांनी माना समाजाच्या मुख्य समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तर माजी राज्यमंत्री डॉ.रमेश गजभे यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या समस्या मांडल्या.कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सत्कारमूर्ती नविर्वाचीत खासदार डॉ. नामदेव किरसान व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॉ मानीकादेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष्य विश्वनाथ श्रीरामे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने माना समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here